HW News Marathi
महाराष्ट्र

Exclusive Chandrakant Patil | उद्धव ठाकरेंना हळूहळू कळेल, ‘हे’ लोक कसे फसवितात ते !

मुंबई | “उद्धव ठाकरेंना हळूहळू कळेल की, हे लोक कसे फसवितात, अशी सुचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केली आहे. ज्या धनंजय मुंडेंनी अजित पवारांच्या शपथविधीमध्ये भूमिका बजावली त्यांनी हे म्हणणे चुकीचे आहे, त्याला म्हणतात की, मनात एक आणि बाहेर एक,” असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. “शरद पवार यांचा जो आत्मविश्वाय या वयात आहे. याबद्दल माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे एच. डब्ल्यू मराठीशी बोलताना पाटील यांनी कौतुक केले.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा स्वत:हून निर्णय घेतला आहे. ज्योतिरादित्या शिंदे त्यांचे आमदार घेऊन बाहेर पडले आणि मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार अडचणी आले. मात्र, महाराष्ट्रात असा कोणी नेता येण्याची आवश्यकता नाही. हे सरकार त्यांच्या विसंवादामुळेच पडेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे. तसेच विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाची चिरफाड केली. ते ऐकताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विचारत पडले की, अजित पवारांनी आपल्याला खूप फसविले, असे हळूहळू त्यांच्या लक्षात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हटले.

दरम्यान, राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पडेल अशी आशा आम्ही लावून बसलो नाही, आम्ही एक भक्कम विरोधी पक्ष म्हणून काम करू, असे आत्मविश्वास चंद्रकांत पाटील यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले. आपआपसातील विसंवादामुळे महाराष्ट्रातील महाविकासआघाडीचे सरकार पडेल. मग, एक पोकळी निर्माण होईल, पुढे बघ काय करायचे ते, असाही पाटील म्हणाले.

अजित पवारांच्या शपथविधीत धनंजय मुंडेंनी बजावली हीभूमिका

“महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबविण्यास भाजपला १० वर्ष लागतील असा प्रश्न विचारल्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, जेव्हा धनंजय मुंडेंनी अजित पवारांच्या शपथविधीमध्ये काही भूमिका बजावली. त्यांनी हे म्हणजे त्यांला म्हणतात की, मनात एक आणि बाहेर एक,” अशी बोचरी टीका धनंजय मुंडेवर केली. महाराष्ट्रात ऑपरेश लोटससाठी काही वर्ष लागतील त्यांच्या या आत्मविश्वासचा मी आदर करतो, असे ते एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाले. महाराष्ट्रातील सरकार अशा पद्धतीने पडणार नाही यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, शरद पवार यांचा जो आत्मविश्वास या वयात आहे. याबद्दल माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप आदर निर्माण होतो. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सारखे जे नेते भाजपमध्ये आले, त्यांचे आम्ही स्वागत करतो, असे पाटील यावेळी म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनामुळे दूरदर्शी, शिस्तप्रिय व निष्ठावान नेतृत्व काळाच्या पडद्याआडः बाळासाहेब थोरात

News Desk

एकनाथ खडसे मुंबईत दाखल, शरद पवारांची भेट घेणार?

News Desk

अजिदादांना आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरण्याचं हे कारस्थान!

News Desk