HW News Marathi
महाराष्ट्र

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कृतीची गरज

मुंबई :मराठी भाषेला आदिम काळाचा इतिहास असून संत, विचारवंत यांनी मराठी भाषा अटकेपार नेली आहे. मात्र सध्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सरकारला पंधरवडा पाळावा लागतो. ही बाब अत्यंत चिंतनीय आहे.मराठी भाषेचे महत्त्व ओळखून तिच्या संवर्धनासाठी धोरणात्मक पाऊले उचलण्याची गरज आहे. आता केवळ चर्चा करून चालणार नाही तर कृतीची गरज निर्माण झाली आहे, असे मत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय मिल मजदूर संघ सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयाच्या वतीने परळ येथील मामासाहेब फाळके सभागृहात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन झाले. त्यावेळी वाचक मेळाव्यात देसाई अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

देसाई म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपण जीवाची बाजी लावून लढलो व मराठी भाषक मराठी राज्याची स्थापना केली मात्र आज आपल्याला मराठी भाषा संवर्धनालाठी टाहो फोडावा लागत आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. राज्य सरकारला या महत्त्वपूर्ण बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मराठी भाषा संवर्धनासाठी धोरणात्मक पाऊल उचलणे महत्त्वाचे आहे, कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून सरकारने कार्यवाही करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

यावेळी गंथालय व वाचनालयाच्या वतीने विविध ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी अण्णा शिर्सेकर, काशिनाथ माटल, सुनील बोरकर, लक्ष्मण तुपे, मोहन पोळ, साईकुमार निकम, अनुजा दळवी, आशा आसबे आदींनी आपले विचार मांडले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शरद पवारांच्या पुस्तकाच्या एका पानातून भाजप राजकारण करतयं,रोहित पवारांचा फडणवीसांवर आरोप !

News Desk

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळांचा शुभारंभ

News Desk

नाशिकमध्ये गोदावरीला पुन्हा पूर

News Desk
राजकारण

राज ठाकरे, विश्वजीत कदम एकत्र

swarit

सांगली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सांगलीत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय वतुर्ळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे शनिवारी एका कार्यक्रमासाठी सांगलीत आले होते. आज सकाळी दहाच्या सुमारास ते अनपेक्षितपणे विश्वजित कदम यांच्या भेटीसाठी भारती रूग्णालयात पोहोचले. रुग्णालयात आल्यानंतर विश्वजीत कदम यांनी राज यांचे स्वागत केले. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत बाळा नांदगावकर आणि अन्य पदाधिकारी होते. रुग्णालयातील एक केबिनमध्ये सुरूवातीच्या गप्पा झाल्यानंतर विश्वजित कदम यांनी सर्वांना बाहेर जाण्याची विनंती केली. त्यानंतर बंद दरवाज्याआड राज आणि विश्वजित कदम यांच्यात तब्बल २० मिनिटे चर्चा सुरू होती.

Related posts

दिल्लीसह मुंबईतील बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

Aprna

नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जाहीर सभा

News Desk

“झोपलेलं सरकार जागं होऊ दे…”; ‘मविआ’चे आमदार सरकारविरोधात आक्रमक

Aprna