HW News Marathi
राजकारण

भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी जे.पी.नड्डा यांची नियुक्ती

नवी दिल्ली | भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे अध्यक्षपद कायम ठेवत भाजपचे ज्येष्ठ नेते जे.पी.नड्डा यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर देशात पुन्हा मोदी सरकार आले. ३० मे रोजी मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा देखील पार पडला. मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात अमित शाह यांना केंद्रीय गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे, आता भाजपच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचेच लक्ष होते.

भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची नियुक्ती येत्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतरच होईल अशी माहिती मिळत होती. त्यामुळेच, अमित शाह यांचे भाजपचे अध्यक्षपद कायम ठेवत पक्षाचे ज्येष्ठ नेते जे.पी. नड्डा यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. गृहमंत्रिपदी जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपल्याकडे असलेल्या पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी अन्य कोणाकडे सोपवावी, असे शहा यांनी सांगितले होते. त्यानुसार, पक्षाच्या संसदीय मंडळाकडून पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी जे.पी. नड्डा यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

EXIT POLL : मध्य प्रदेशात भाजप-काँग्रेसमध्ये कडवी टक्कर

News Desk

आठवलेंच्या मेणाच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उदघाटन

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर त्यांच्या अपयशाची कबुली दिली | अब्दुल्ला

News Desk