लखनऊ | राष्ट्रवादी कॉंग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला बुचकळ्यात पाडणारा प्रश्न विचारला आहे. तुम्ही राम मंदिरासाठी ट्रस्ट उभी करु शकता मग मशिदसाठी का नाही असा प्रश्न शरद पवार यांनी काल (१९ फेब्रुवारी) लखनऊच्या रविंद्रालयामध्ये आजोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात विचारला. भाजपच्या विरोधी पक्षातील सगळ्या पक्षांनी मिळून भाजपविरुद्ध निवडणूक लढवली पाहिजे. तसेच लोकांना धर्माच्या आधारे वेगळे करण्याचे काम केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारमधील भाजप करत असल्याचा आरोपही यावेळी शरद पवार यांनी केला.
NCP Chief Sharad Pawar in Lucknow: Aap jaise Ram Mandir banane ke liye Trust bana sakte hain, masjid banane ke liye Trust kyun nahi bana sakte? Desh to sabka hai, sabhi ke liye hai. pic.twitter.com/kfxloeYP3v
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 19, 2020
दरम्यान, राम मंदिर ट्रस्ट उभारण्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय असेल तो मान्य केला जाईल. तसेच शांतता आणि ‘बंधुभाव सगळ्यांनाच हवा आहे. त्यामुळे हा वाद कायमचा मिटवावा,’ असे मत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले होते. राम मंदिर निर्मितीसाठी समितीही तयार करण्यात आली असून नृपेंद्र मिश्रा या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीच्या अहवालानंतर राम मंदिर निर्मितीची तारीख निश्चित केली जाणार आहे.
चंतप राय यांनी याबाबत म्हटले की, अयोध्येतील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत श्रीराम ट्रस्टचे खाते खोलण्याचा निर्णय कालच्या (१९ फेब्रुवारी) बैठकीत घेण्यात आला. रामनवमीला राम मंदिर निर्मितीला सुरुवात होणार नाही हे निश्चित झाले आहे. दरम्यान, श्रीराम जन्मभूमी ट्रस्टची पुढील बैठक अयोध्या येथे पुढील १५ दिवसांच्या आत होणार आहे. ‘रामनवमीपासून राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात होणार नाही. जुन्या आराखड्यावर मंदिराचs बांधकाम सुरु होणार आहे. यासाठी कोरेलेल्या दगडांचा वापरही केला जाणार’, असल्याची माहिती परमानंद यांनी दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.