मुंबई। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९०वी जयंती आज (१९ फेब्रुवारी) मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी गडासह राज्यभरात ठिकठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडणार आहे. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शासकीय शिवजयंती निमित्त उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे हे तिथीनुसार जयंतीला शिवनेरीवर येत असतात. मात्र, आता मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच तारखेनुसार जयंतीला येणार आहेत.
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील काही मंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. सर्व मंत्र्यांच्या उपस्थिती शिवजयंतीचा उत्सव साजरा होणार आहे. शिवनेरी गडावर जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समोर पारंपारिक खेळांच सादरीकरण करण्यात आले.
राज्यभरात शिवजयंती उत्साह
कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये विक्रमी सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम करण्यात आला. या उपक्रमात ४०० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यामध्ये चाळीस मिनिटांमध्ये १ लाख ४ हजार ४४४ सूर्यनमस्कार घालण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात मध्यरात्री १२ वाजता पाळणा झुलवत शिवजन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. सोलापूरच्या इतिहासात प्रथमच डोळ्याचे पारणे फेडणारा हा जन्मोत्सव सोहळा ठरला. हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात शिवजयंतीनिमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.