HW News Marathi
राजकारण

डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आता गरिबांना घरे रिकामी करावी लागणार ?

अहमदाबाद | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार म्हणून त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी चालू असताना नव्या मोटेरा स्टेडियम परिसरातील ४५ घरे रिकामी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. संबंधितांना घरे रिकामी करण्यासाठी ७ दिवसांची मुदत अहमदाबाद महानगरपालिकेने दिली आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे २४ फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादमध्ये येणार आहेत आणि त्याचदिवशी ही घरे रिकामी करण्याची मुदतही संपत आहे.

मोटेरा स्टेडियमजवळ असलेल्या या वस्तीत एकूण ४५ घरे असून जवळपास २०० जण राहतात. ही सगळी माणसे अधिकृत बांधकाम कामगार आहेत. नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला ही घरे रिकामी करण्याची नोटीस पाठवल्याचा दावा येथील रहिवाशांनी केला आहे. गेल्या २० वर्षांपासून तिथे राहणाऱ्या रहिवाशांनी केलेला हा दावा अहमदाबाद महानगरपालिकेने फेटाळून लावला. आणि घरे रिकामी करण्याचा आणि ट्रम्प तिथे येण्याचा काहीही संबंध नसल्याचाही पालिकेने सांगितले.

अहमदाबाद महानगरपालिकेने रहिवाशांना पाठवलेल्या नोटिसमध्ये रहिवाशी ज्या जमिनीवर राहतात ती जमीन पालिकेची असून तुम्ही त्यावर अतिक्रमण केले आहे आणि ती जमीन शहर रचना योजनेअंतर्गत येते असे लिहिले आहे. तसेच जर रहिवाशांना या नोटीस विरोधात अपील करायचे असल्यास १९ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, झोपडप्टीवासीयांना बजावण्यात आलेल्या या नोटीसीचा संबंध डोनाल्ड ट्रम्प यांच्या येण्याशी संबंधित नसल्याची माहिती पालिकेच्या मोटेरा वॉर्डचे सहाय्यक शहर विकास अधिकारी किशोर वर्मा यांनी दिली. काहीजण ट्रम्प यांच्या कार्यक्रमाचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपदेखील केला आहे. आता नेमकी या रहिवाशांना बेघर करण्यामागचे खरे कारण काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ED च्या ताब्यात

Aprna

संसदेचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान होणार

News Desk

पावसाळी अधिवेशनाच्या तारखेत बदल; ‘या’ तारखेला अधिवेशन होण्याची शक्यता

Aprna