HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (१४ जून) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असातानाच, स्वत: मुख्यमंत्र्यांनीच ट्विट करुन उद्धव ठाकरेंची भेट घेतली असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतच्या चर्चेला नवे वळण लागले आहे.

मुख्यमंत्र्यांनी खुद काल रात्री १०.११ मिनीटांनी ट्विट करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेजी यांची काल मातोश्री येथे भेट घेतली आणि मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात विस्तृत चर्चा केली. अशी माहिती दिली आहे. सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी विस्तार होईल, असे मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केले होते.

राधाकृष्ण विखे यांना मंत्रीपद देण्यास भाजपमधील निष्ठावंतांचा विरोध असल्याची चर्चा आहे. परंतु विखे व मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे मंत्रीपद निश्चित असल्याचे सुत्रांडून माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ते भेट घेणार आहेत. त्यानंतरच विस्ताराबाबत जाहीर केले जाईल, तर अधिवेशनापूर्वी म्हणजेच रविवारी (१६ जून) मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधकांनी मढय़ावरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करू नये , राऊतांचा भाजपला टोला!

News Desk

नारायण राणे दिल्लीला रवाना! नेमकं काय कारण?

News Desk

राजकीय आणि उर्वरित आयुष्यात लोकांनी बनवलेली लिडर होणं पसंत करेन – उर्मिला मातोंडकर

News Desk