श्रीनगर | जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज (११ जून) पहाटेपासून चकमक सुरू होती. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. शोपियान जिल्ह्यातील अवनीरा भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी परिसरात शोध मोहिम हाती घेतली. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
Jammu & Kashmir: Two terrorists have been neutralised in an encounter between terrorists and security forces which broke out earlier this morning, in Awneera area of Shopian district. Search operation is underway. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/9pQIc4n3N4
— ANI (@ANI) June 11, 2019
चकमकीत मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. शायर अहम भट (कुलगाम) आणि शाकिर अहमद वगाय (शोपियां) अशी त्यांची नावे आहेत. हे दोन्ही दहशतवादी अंसार गजवा तुल हिंद संघटनेशी संबंधित आहे. गेल्या काही दिवसांपासून जवान त्यांच्या शोधात होते.
याआधी अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवाद्याला मारले होते. जम्मू- काश्मीरमध्ये जवानांनी यंदा आतापर्यंत १०६ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर २०१८ मध्ये २५४ दहशतवादी मारले गेले होते. दरम्यान, पाकिस्तानने यंदा आतापर्यंत १,१७० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. तर गेल्या वर्षी १,६२९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.