मुंबई | कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान एनसीबीच्या एसआयटी टीमने क्लिनचीट मिळाली आहे. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आज (२७ मे) मुंबई सत्र न्यायालयात १० खंडाचे ६००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ड्रग्ज प्रकणात एनसीबीने एकून सहा जणांना क्लिनचीट दिली असून या सहा जणांमध्ये आर्यन खानचे नाव आहे. या सहा जणांकडे अमली पदार्थ सापडलेला नाही. त्यामुळे एनसीबीने आर्यन खान आणि महक या दोघांना क्लिनचीट देण्यात आली आहे. परंतु, आर्यन खानचे मित्र मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांच्याकडे अमली पदार्थ सापडेल होते. एनसीबीच्या टीमने मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट या दोघांना मात्र क्लिनचीट दिलेली नाही.
दरम्यान, आर्यन खान, अविन साहू, गोपालजी आनंद, समीर सैघन, भास्कर अरोडा, आणि मानव सिंघल या सहा जणांकडे एनसीबीला कोणत्याही अमली पदार्थ सापडले नाही. त्याचबरोबर एनसीबीच्या टीमने मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट या दोघांना मात्र क्लिनचीट दिलेली नाही. एनसीबीने १४ जणांवर आज पहिले आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी एसआयटीला न्यायालयाने ६० दिवसांची मुदतवाढ दिली होती. या प्रकरणात आर्यन खानसह २० जणांना एनसीबीने अटक करण्यात आले होते.
Cruise drug bust case | All the accused persons were found in possession of Narcotics except Aryan and Mohak, reads a statement of Sanjay Kumar Singh, DDG (Operations), NCB
— ANI (@ANI) May 27, 2022
नेमके काय आहे प्रकरण
कॉर्डिलिया क्रूझमध्ये २ ऑक्टोबरला एनसीबीने छापा टाकला होता. यात एनसीबीला १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम मेफेड्रोन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमच्या २२ गोळ्या आणि दीड लाखांपर्यंत रोकड जप्त केली होती. यात बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खानकडे आम्ली पदार्थ सापडल्यामुळे एनसीबीने त्यांना अटक केले होते. यानंतर आर्यनला मुंबईच्या आर्थर जेलमध्ये होता. यानंतर आर्यनला जामीन मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. पंरतु, न्यायालयाने दोन वेळा आर्यनचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. या प्रकरणी आर्यन खान हा मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. गेल्या २६ दिवसांनंतर आर्यनला २८ ऑक्टोबरला हायकोर्टाकडून जामीन मंजूर मिळाला आला. आर्यनला ३० ऑक्टोबरला तुरुंगातून सुटका झाली. या प्रकरणात आर्यन खानसह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट अटक केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.