HW News Marathi
महाराष्ट्र

“सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार?”- अजित पवार

मुंबई | करोना संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. बैठकीत त्यांनी करोना त्याच्या नियमावली संदर्भात काही सूचना केल्या. राज्यात ऑक्सिजन ७०० मेट्रिक टनापेक्षा जास्त लागला तर कठोर निर्णय घ्यावे लागतील,आता २०० मेट्रिक टन लागत आहेत, असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. यावेळी त्यानी सध्या राज्यात घडत असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलेल्या खात्यावर निशाणा साधला.

पोलिसांनी लगेच कोणती कारवाई केली नव्हती

“पोलिसांनी लगेच कोणती कारवाई केली नव्हती. त्यांचे काही लोकं कोर्टात गेलं आणि कोर्टानं नाकारलं. हायकोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. ते झाल्यानंतर पुढच्या गोष्टी घडल्या.”प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. या चौघांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर सांगितलं फिरा. आता मंत्रिपद मिळाल्यानंतर फिरणं भाग आहे. प्रत्येकाने जर भान ठेवून वक्तव्य केलं असतं तर हे प्रसंग आले नसते.”, असं पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना अजित पवार यांनी सांगितलं.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलेल्या खात्यावर निशाणा साधला. त्यांच्या मंत्रालयाकडून काय निधी मिळणार असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच राज्यपाल काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असून आम्ही त्यांची १ सप्टेंबरला भेट घेणार आहोत असही त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंचसूत्रीच्या यशस्वी अंमलबजावणीतून एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची उद्दिष्टपूर्ती! – उद्धव ठाकरे

Aprna

CCTV फुटेजमध्ये पीपीई किट घालून दिसणारी ती व्यक्ती कोण? NIA करणार तपास

News Desk

भावाला मंत्री केलं नाही म्हणून राऊत बिथरले । विनोद तावडे

swarit