HW News Marathi
देश / विदेश

शरजीलच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या उर्वशी चुडावालाचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई | जेएनयूचा विद्यार्थी शर्जील इमामच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या उर्वशी चुडावाला हिचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे उर्वशी चुडावाला हिला अटक निश्चत आहे. चुडावाला यांच्यासह ५० विद्यार्थ्यांवर मुंबई पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास चुडावालासह ५० जणावर भारतीय दंड संहिता (आय.पी.सी) कलम १२४ ए, १५३ बी, ३४ आणि ५०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलिस ठाण्यात दाखल देशद्रोहाच्या गुन्ह्यातील आरोपी उर्वशी चुडावाला हिच्या आईने काल (४ फेब्रुवारी) पोलीस ठाण्यात हजेरी लावली असून पोलिसांनी तिच्या आईचा जबाब नोंदविला आला आहे.

चुडावालाने शर्जील इमाम हा कथित भडकाऊ भाषण प्रकरणात देशद्रोहाच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या रिमांडवर आहे. शर्जील इमामने आसामला भारतापासून वेगळे करण्याचे वक्तव्य केलो होते. यामुळे त्याच्याविरोधात देशद्रोह आणि भावना दुखावल्याच्या आरोपांसह गुन्हा दाखल आहे.

नेमके काय आहे प्रकरण

मुंबईतील आझाद मैदानात शनिवारी (१ फेब्रुवारी) मुंबई प्राइड २०२० चे आयोजक असलेल्या ‘क्वीर आझादी मुंबई’ (QAM) या संस्थेने नावाने LGBTQ समुहाने एक रॅली आयोजित केली होती. यात एका गटाने शरजील इमामच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी या गटाशी संबंधित लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींच्या ‘हम दो हमारे दो’च्या टोमण्याला अर्थमंत्र्यांनी दिले उत्तर!

News Desk

देशात कोणीही सेक्युलर नाही, ‘ती’ एक प्रकारची शिवी । संजय राऊत

Gauri Tilekar

तुम्हाला हव्या त्या वस्तू खरेदी करा, निघून जा !

News Desk