HW News Marathi
Uncategorized

पुढच्या वर्षी वाढणार या क्षेत्रातील नोकरदारांचे पगार

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): भारतीय रोजगार क्षेत्राच्यादृष्टीने एक आशादायक अहवाल समोर आला आहे. या अहवालात आशियाई पॅसिफिक परिसरातील देशांमध्ये २०१८ साली होणा-या वेतन श्रेणीतील बदलांवर भाष्य करण्यात आले आहे. आशियाई पॅसिफिक परिसरात भारत हा सर्वाधिक पगारवाढ होणार देश ठरेल. भारतातील उर्जा, गृहपयोगी वस्तूंचे उत्पादन (एफएमसीजी) आणि रिटेल क्षेत्रातील कर्मचा-यांना सर्वाधिक पगारवाढ मिळेल. २०१७ प्रमाणे देशभरात पगार वाढण्याचे प्रमाण सरासरी १० टक्के इतके असेल, असे ‘सॅलरी बजेट प्लॅनिंग रिपोर्टच्या’ तिमाही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, अहवालात बीपीओ, केमिकल्स, बांधकाम क्षेत्र आणि अभियांत्रिकी, ग्राहकोपयोगी उत्पादने, रिटेल, आर्थिक सेवा, उच्च तंत्रज्ञान, उत्पादन, मीडिया, औषध आणि आरोग्य शास्त्र, उद्योग आणि तांत्रिक समुपदेशन, वाहतूक आदी क्षेत्रांसंदर्भात सविस्तर भाष्य करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nashik Bus Accident : 11 प्रवाश्यांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

Seema Adhe

अन्ननलिकेतून काढले देवाचे लॉकेट

News Desk

उल्हासनगरमध्ये राजकीय वैमनस्यातून तुफान हाणामारी

News Desk