HW News Marathi
महाराष्ट्र

भोकर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी संगीता विनोद चिंचाळकर तर उपाध्यक्षपदी जरीना शेख युसूफ

भोकर:- दि.९ नोव्हेंबर २०१७ रोजी नगर परिषदेच्या सभागृहात पीठासिन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सौ.दीपाली मोतीयेळे व सहाय्यक अधिकारी तहसिलदार व्यंकटेश मुंडे आणि मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्या उपस्थितीत पार पडली.भोकर नगर परिषद सभागृहात काँग्रेस पक्षाचे १४,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ३ व भाजपाचे २ असे पक्षीय बळ असलेल्या एकूण १९ नगरसेवकांतून सर्वसाधारण महिला राखीव नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षातर्फे नगरसेविका सौ.संगीता विनोद पाटील चिंचाळकर व रा.काँ.पार्टीच्या नगरसेविका सौ.अरुणा विनायकराव कदम देशमुख यांचा तर उपाध्यक्ष पदासाठीकाँग्रेस पक्ष प्रणित अपक्ष नगरसेविका जरीना बेगम शेख युसूफ आणि रा.काँ. पार्टीचे नगरसेवक खाजा तौफिक खाजा नाजिम इनामदार यांचे उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्यावरुन सकाळी ११:०० वाजता प्रथम नगराध्यक्ष पदासाठी हात वर करुन मतदान प्रक्रिया घेण्यात आली असता काँग्रेसच्या नगरसेविका अफसरी बेगम शेख गफार या अनुपस्तित राहिल्याने तीन विरुद्ध तेरा असे मतदान होऊन नगराध्यक्षपदी सौ .संगीता विनोद पाटील चिंचाळकर यांची निवड झाली.तर दुपारी ३:४५ वाजता सौ.दीपाली मोतीयेळे व नूतन नगराध्यक्षा तथा पीठासिन अधिकारी सौ.संगीता विनोद चिंचाळकरयांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत पुनश्च तीन विरुद्ध तेरा अशा बहुमतांनी उपाध्यक्षपदी जरीना बेगम शे.युसूफ यांची निवड करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकारने जाचक रस्ते विकास सेस बंद करावा किंवा देशभरातील टोल तरी बंद करावेत !-  नाना पटोले

News Desk

चंद्रकात पाटील माफी मागा,राष्ट्रवादी आक्रमक !

News Desk

सुशांतच्या आत्महत्येवर मीडियात होणारी चर्चा आश्चर्यकारक, शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याकडे मिडियाचे लक्षच नाही

News Desk