HW News Marathi
देश / विदेश

संभाजीराजे राज्यसभा निवडणूक लढणार की माघार घेणार?, उद्या घेणार पत्रकार परिषद

मुंबई | संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभेची निवडणूक लढणाक की माघार यासंदर्भात उद्या स्पष्ट होईल. संभाजीराजे छत्रपती हे उद्या (२७ मे) सकाळी ११ वाजता मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेणार आहे. यात संभाजीराजे राज्यसभा निवडणुकीसंदर्भात महत्वाची घोषणा करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच संभाजीराजेंनी राज्यसभेची निवडणूक ही अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली होती. यावेळी संभाजीराजेंनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सर्व पक्षांनी मते देऊन अपक्ष म्हणून राज्यसभेवर पाठवण्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते.   

राज्यसभेत शिवसेनेने पाठिंबा देण्यासाठी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली होती. परंतु, संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी अट घातल्याची माहिती मिळाली होती. आणि यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख संजय पवार या दोन जणांनची नावे जाहीर केली. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपने त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर केली नाही. या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंच्या उद्या होणारी पत्रकार परिषद महत्वाची आहे. यात संभाजीराजे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शिवसेनेकडून आज संजय राऊत आणि संजय पावर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकासआघाडीचे नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणुका होणार आहे. विधानसभेते २८८ असे सदस्य असून संख्याबळानुसार महाविकासआघाडीचे चार तर भाजपचे दोन सदस्य राज्यसभेवर सहज जावू शकतात.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिमाचल प्रदेशमध्ये खासगी बसचा भीषण अपघात, ४४ जणांचा मृत्यू

News Desk

आता राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ईश्वराच्याच हातात !, चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

News Desk

#CoronaVirus | रविवारी संघाच्या शाखा सुरुच राहणार, पण …!

News Desk