HW News Marathi
मुंबई

डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण | तिन्ही आरोपींच्या जामीनाची सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने डाॅ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही महिला आरोपी डॉक्टरांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर क्राईम ब्रँचला आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले असून या प्रकरणाची सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब केली आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून ३१ मे रोजी या तिन्ही आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी क्राईम ब्रँचकडे सोपविली असली तरीही आरोपींची पोलीस कोठडी न मिळाल्याने क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना आरोपींची चौकशी करता आलेली नाही.

क्राईम ब्रँचने आता डॉ. पायल तडवी प्रकरणातील आरोपींची पोलीस कोठडी मिळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, क्राईम ब्रँचला आरोपींची पोलीस कोठडी मिळण्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून तातडीने सुनावणी करण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांची ही मागणी मान्य करत उद्या (६ मे) आरोपींच्या कोठडीप्रकरणी सुनावणी ठेवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Breaking News | सायन रुग्णालयात एका गोविंदाचा मृत्यू

News Desk

उद्धव ठाकरें कोण म्हणाल उद्धट ?

News Desk

अंगावर झाड पडून वकिलाचा मृत्यू

News Desk