HW News Marathi
मुंबई

बेस्ट कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

मुंबई – बेस्ट हा मुंबई महापालिकेचा अंतर्गत उपक्रम आहे, त्यामुळे तोट्यात चाललेल्या बेस्टला मुंबई महापालिकेने अर्थ सहाय्य करावे आणि बेस्टची जबाबदारी महापालिकेने स्वीकारावी या मागणीसाठी बेस्ट कर्मचारी व बेस्ट कृती समितीचे पदाधिकारी व सदस्य मंगळवारपासून वडाळा डेपो परिसरात बेमुदत उपोषणला बसले आहेत.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या अस्तित्वासाठी 12 संघटनांसह बेमुदत उपोषण पुकारले आहे.

बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेस्टचे कर्मचारी साखळी उपोषणाला बसले आहेत. तर बेमुदत उपोषणाला बेस्ट वर्कर्स युनियनचे शशांक राव, रंजन चौधरी, ज.म.कहार, अरुण दळवी, नितीन पाटील, डी.के. सिंह हे प्रमुख नेते तसेच सुहास मांजरेकर,अविनाश तांदळे, देवेंद्र दुबे, बाळासाहेब पोटे,संजय आंब्रे हे कर्मचारी देखील बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

बेस्ट वर्कर्स युनियन, बेस्ट कामगार सेना, बेस्ट कामगार संघटना, समर्थ बेस्ट कामगार संघटना, भाजप बेस्ट कामगार संघ, बेस्ट कामगार युनियन, बेस्ट एम्प्लॉइज युनियन, बेस्ट परिवहन कर्मचारी संघ, बेस्ट जागृत कामगार संघटना आदी संघटनांनी बेमुदत उपोषणात सहभागी झाल्या आहेत.

बेस्टला महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहणार आहे. त्यामुळे हे उपोषण किती दिवस ताणायचे हा निर्णय महापालिकेने घ्यायचा आहे. हे आंदोलन महापालिका आयुक्तांविरोधात असल्याचे बेस्ट कामगार नेते सुहास सामंत यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिग्दर्शक निशिकांत कामत अजूनही जिवंत… रितेश देशमुख यांनी केले स्पष्ट

swarit

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

News Desk

मुंबईत पावसाची दमदार हजेरी, काही भागात साचले पाणी

News Desk