मुंबई। महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल (२९ जानेवारी) बीड येथील संविधान बचाव सभेत वादग्रस्त केले आहे. “देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता”, असे वक्तव्य आव्हाडांनी केले होते. आव्हानांच्या वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या वक्तव्यावर वाद पेटून उटण्याची शक्यता वाटताच आव्हाडांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. या वक्तव्यावर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करुन स्पष्टीकरण दिले.
इंदिरा गांधी ह्यांच्या असामान्य कर्तुत्वा बद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे.
त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते पण आणिबाणी बद्दल मतमतांतर असू शकतात पण एक सत्य मात्र मी लपवू इच्छित नाही इंदीराजींची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही ते जवळ. पास हि पोहचू शकत नाही pic.twitter.com/X97RZK9J9o— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 29, 2020
आव्हानांनी स्पष्टीकरण देताना काय म्हणाले
“बीडमधील माझ्या भाषणाचे अर्थ अनर्थ काढले जात आहेत. मी स्पष्ट सांगतो, इंदिरा गांधींना अतिशय आदर्श मानणारा राजकीय कार्यकर्ता आहे, ज्याच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. काँग्रेस पक्ष म्हणून नाही तर काँग्रेस ही लोकचळवळ आहे जी महात्मा गांधींजींची लोकचळवळ आहे. संयुक्त महाराष्ट्रासह मुंबई झालीच पाहिजे हा निर्णय जेव्हा आला, तेव्हा यामागील प्रमुख भूमिका इंदिरा गांधींची होती. पंतप्रधान झाल्यानंतर बँकांचे राष्ट्रीयकरण, राजा-महाराजांचे तनखे बंद करणे, 71 साली पाकिस्तानचे दोन तुकडे करणे, सिक्कीम खेचून घेऊन समाविष्ट करणे, चीनला धक्का देणे, पोखरणला अणुचाचणी घेणे. पण 75 ते 77 च्या काळामध्ये त्यांच्या काही भूमिकांमुळे लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांवर गदा येतेय असे इथल्या जनतेला वाटू लागले. काही जण त्यांच्या बाजूने होते, काही विरोधात होते. या सगळ्याविरुद्ध 74 साली विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं आणि कालांतराने त्याचे नेतृत्त्व जयप्रकाश नारायण यांनी केले, 77 साली इंदिरा गांधींचा पराभव झाला. हा इतिहास आहे. देशात जेव्हा जेव्हा लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणली जाते, असे जनतेला वाटते, तेव्हा जनता पेटून उठते. आज अमित शाह आणि मोदींविरोधात तेच घडतेय. माझे म्हणणेच ते आहे आणि मी ठामपणाने बोलतो, जर या देशात इंदिरा गांधींचा पराभव होऊ शकतो, ज्यांच्याएवढे कर्तृत्त्व कोणाचेच नव्हते, तर मोदी आणि अमित शाह कोण आहेत? माझे मित्र किरीट सोमय्यांनीही लक्षात ठेवावे, मी इंदिरा गांधींचा समर्थक आहे आणि मला लाज नाही वाटत सांगायला. इंदिरा गांधींची तुलना मोदी-शाहांशी होऊच शकत नाही. हे त्यांनी लक्ष्यात ठेवावे”
बीडमधील सभेत जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
“आणीबाणीच्या माध्यमातून इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा देशात कुणीही बोलायला तयार नव्हते. पण पहिल्यांदा कोणी आवाज उचलाल असेल. तर अहमदाबादच्या आणि पाटण्याच्या विद्यार्थ्यांनी आवाज उठवला. आणि त्यांच्यातून जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन सुरु झाले. अखेरीस इंदिरा गांधी यांचा पराभव झाला. हा इतिहास परत एकदा महाराष्ट्रात आणि देशात घडेल. याचे श्रेय आपण हैदराबाद विद्यापीठ आणि जेएनयू तिथल्या विद्यार्थ्यांला द्यावे लागेल. विद्यार्थी बिनदास्त बाहेर परड आहेत. आव्हान देत आहेत. कायदा समजून सांगतात. आज विद्यार्थी संख्येने कमी दिसत आहेत. मात्र ही संख्या हळूहळू वाढेल आणि एक नवीन नेतृत्त्व निर्माण करेल,” असा विश्वास आव्हाड यांनी बीडच्या सभेत व्यक्त केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.