HW News Marathi
Uncategorized

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना मिळाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

नवी दिल्ली | राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. यामुळे पुढील पाच वर्ष डोवाल सल्लागार म्हणून मुदतवाढ देण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (३ जून) महत्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर डोवाल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

डोवाल यांचे राष्ट्रीय सुरक्षेसाठी केलेल्या योगदान लक्षात घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. मोदी यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय समजले जातात. त्यांच्या निरीक्षणात भारताने पाकिस्तानविरुद्ध सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट एअर स्ट्राईक हे त्यांच्याच देखरेखीत यशस्वीरित्या घडवून आणण्यात आले होते. डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी २०१४ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची नियुक्ती केली होती. डोवाल १९६८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोणतीही पुर्वकल्पना न देता केंद्राने हटवली शरद पवारांची सुरक्षा

swarit

“वाघ आहे मी लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही”, चित्रा वाघ यांचं महेबूब शेख यांना प्रत्युत्तर

News Desk

“करोनामध्येही सरकारला सावकारासारखी वसुली करायचीय, म्हणून हे सगळं नाटक सुरू”

News Desk