HW News Marathi
महाराष्ट्र

गांधींबद्दल वादग्रस्त ट्वीट करणाऱ्या निधी चौधरीविरोधात कारवाई करा | शरद पवार

मुंबई | महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त ट्वीट करणाऱ्या आयएएस अधिकारी आणि सध्या मुंबई महापालिकेत उपायुक्त पालिका उपायुक्त निधी चौधरी यांच्यावर तात्काळ करावाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. यासंदर्भात पवारांनी पत्र लिहिले असून ते मुख्यमंत्र्यांना पाठविल. हेच पत्र पवारांनी त्यांच्या ट्वीटर हॅण्डलवर ट्वीट देखील केले आहे. एका अधिकाऱ्यांनी असे वक्तव्य करणे ही अत्यंत गंभीरबाब असल्याचे पवारांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.

काय आहे नेमके प्रकरण

“गांधींची १५० वी जयंती साजरी केली जात आहे. हीच योग्य वेळ आहे गांधींचा फोटो नोटेवरुन काढून टाकण्यासाठी आणि जगभरातील त्यांचे पुतळे हटवण्यासाठी. आता आपल्याला एक खरी श्रद्धांजली देण्याची गरज आहे. धन्यवाद गोडसे ३० जानेवारी १९४८ साठी.’ असे ट्वीट निधी चौधरी यांनी केले होते. चौधरींनी १७ मे रोजी गांधींबाबत ट्वीट केले होते. या ट्वीटनंतर वाद पेटल्याने त्यांनी ते ट्वीट डिलीट करून या प्रकरणाची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

 

वादग्रस्त वक्तव्यानंतर चौधरींची सारवासारव

यानंतर चौधरी यांनी पुन्हा एकदा ट्वीट केले असून यात म्हटले की, ‘काही लोकांचा गैरसमज झाल्यामुळे मी गांधीजींबाबतचे ट्वीट डिलीट केले आहे. तुम्ही २०११ पासून माझी टाईमलाईन पाहिलीत, तर त्यांना समजेल, की मी गांधीजींचा अवमान करण्याचा स्वप्नातही विचार करु शकत नाही.’ निधी चौधरी या २०१२ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या मुंबई महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहत आहे.

https://twitter.com/nidhichoudhari/status/1134520012398456832

शरद पवारांनी ट्वीटमध्ये काय म्हटले

“शासकीय सेवेतील एका जबाबदार अधिकार्‍याने अशी जाहीरपणे भूमिका घेणे केवळ लांछनास्पद नसून सक्त कारवाईस पात्र आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून या अधिकार्‍यावर कडक कारवाई करावी,” असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या ट्वीटर हॅण्डलवरून मुख्यमंत्र्यांना लिहलेले पत्र त्याला जोडले आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष एक नंबरच पक्ष होण्यास वेळ लागणार नाही, खडसेंचा विश्वास

News Desk

सर्वसामान्य कार्यकर्ता झाला गोकुळचा संचालक, बंटी पाटलांच्या या विश्वासाने बयाजी शेळकेंना अश्रू अनावर

News Desk

मुख्यमंत्र्यांचा स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता असू शकते – राधाकृष्ण विखे पाटील

News Desk