HW News Marathi
मुंबई

मनसेला जशाच तसे उत्तर दिले, संजय निरुपमवर गुन्हा

मुंबई: मनसेच्या कार्यकर्त्यांना प्रसंगी कायदा हातात घेऊन चोख प्रत्युत्तर द्या, अशी चिथावणी देणारी भाषा वापरली म्हणून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्याविरुद्ध रविवारी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवाीर मालाड येथे फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करण्यासाठी गेलेले मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. यावेळी काही जणांनी माळवदे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केले. तसेच त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये माळवदे यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्याचे संजय निरूपम यांनी ‘जैसी करनी वैसी भरनी’ म्हणत समर्थन केलं होतं. तसेच मालाडमध्ये निरूपम यांनी कोणतीही परवानगी न घेता सभा घेतली होती. त्यामुळे निरूपम यांच्यावर विनापरवानगी सभा घेणे आणि प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं मालाड पोलिसांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यावर्षी व्हाईट हाऊसमध्ये झाली नाही ईद साजरी

News Desk

२०० रूपयांची नोट लवकरच

News Desk

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई

News Desk