HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणे यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यास शिवसेनेचा अडथळा

मुंबई – काँग्रेसमधून बाहेर पडून एनडीएच्या गोटात सहभागी झालेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या राज्य मंत्रिमंडळातील प्रवेशामध्ये शिवसेनेने अडथळा आणल्याचे वृत्त आहे. नारायण राणेंना राज्य मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शिवसेनेला गांभीर्याने विचार करावा लागेल, अशा आशयाचा निरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस यांना पोहोचवला आहे.

या संदभार्तील वृत्त एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत नारायण राणेंनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याची घोषणा केली होती. मात्र राणेंचा राज्य मंत्रिमंडळातील प्रवेश अद्याप अडलेला आहे. राणेंच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह बैठका झाल्या आहेत. मात्र त्यांच्या मंत्रिपदाविषयी अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. राणेंच्या एनडीए प्रवेशामुळे नाराज असलेल्या शिवसेनेने आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपले सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकरवी आपला निरोप मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवला आहे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाला अनुकूलता दर्शवली होती.नारायण राणे यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यास शिवसेनेचा अडथळा मुंबई – काँग्रेसमधून बाहेर पडून एनडीएच्या गोटात सहभागी झालेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या राज्य मंत्रिमंडळातील प्रवेशामध्ये शिवसेनेने अडथळा आणल्याचे वृत्त आहे. नारायण राणेंना राज्य मंत्रिमंडळात स्थान दिल्यास शिवसेनेला गांभीयार्ने विचार करावा लागेल, अशा आशयाचा निरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस यांना पोहोचवला आहे.

या संदभार्तील वृत्त एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. आॅक्टोबर महिन्याच्या सुरुवातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत नारायण राणेंनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होण्याची घोषणा केली होती. मात्र राणेंचा राज्य मंत्रिमंडळातील प्रवेश अद्याप अडलेला आहे. राणेंच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह बैठका झाल्या आहेत. मात्र त्यांच्या मंत्रिपदाविषयी अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. राणेंच्या एनडीए प्रवेशामुळे नाराज असलेल्या शिवसेनेने आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपले सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकरवी आपला निरोप मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवला आहे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाला अनुकूलता दर्शवली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट प्रकरण; चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Aprna

ओबीसी आरक्षणावर आज मंत्रिमंडळाची बैठक, छगन भुजबळ यांची माहिती!

News Desk

Ayodhya Case : आज सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता

News Desk