HW News Marathi
मुंबई

म्हाडाच्या २१७ घरांसाठी आज सोडत

मुंबई | म्हाडा मुंबई मंडळातर्फे आज (२ जून) २१७ सदनिकांसाठी म्हाडा भवनमध्ये सोडत होणार आहे. या घरांसाठी तब्बल ६६ हजार ९९ अर्ज दाखल झाले होते. मुंबई आणि कोकण विभागात काल (१ जून) २७६ दुकानांची लॉटरीही जाहीर होणार असल्याचे म्हाडातर्फे सांगण्यात आले. आज सोडतीचा निकाल पाहण्यासाठी म्हाडा भवनमध्ये होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता म्हाडाने चोख व्यवस्था ठेवली आहे.

मुंबईतील २१७ सदनिकांची लॉटरी २१ एप्रिलला जाहीर होणार होती. परंतु, लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता असल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती. या घरांसाठी तब्बल ७८ हजार ७७३ जणांनी अर्ज केले होते. मात्र, त्यापैकी ६६ हजार ९९ जण पात्र ठरले. या लॉटरीमध्ये शेल टॉवर चेंबूर आणि कोपरी-पवई येथील २१७ घरांचा समावेश आहे.

म्हाडाच्या २७६ दुकानांचा काल ई-लिलाव होणार असून मुंबई मंडळांतर्गत असलेल्या प्रतीक्षानगर (सायन), न्यू हिंद मिल-माझगाव, विनोबा भावेनगर-कुर्ला, स्वदेशी मिल-कुर्ला, तुर्भे मंडाले-मानखुर्द, तुंगा पवई, गव्हाणपाडा-मुलुंड, मजासवाडी-जोगेश्वरी, शास्त्रीनगर-गोरेगाव, सिद्धार्थनगर-गोरेगाव, चारकोप, मालवणी- मालाड येथील २०१ गाळ्यांचा समावेश आहे. तर कोकण मंडळांतर्गतच्या विरार बोळिंज, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग येथील ७७ सदनिकांचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नीट परीक्षेसाठी लढा देणाऱ्या तरूणची आत्महत्या

News Desk

अबू सालेमच्या निकाहाला विघ्न, हायकोर्टाने पॅरोल याचिका फेटाळली

swarit

मध्य रेल्वेचा रविवार जम्बोब्लॉक

News Desk