HW News Marathi
मुंबई

ठाण्यातील कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये शिरला बिबट्या

ठाणे | कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये बिबट्या शिरल्‍याची घटना समोर आज (२० फेब्रुवारी) पाहटे ५.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी आज सकाळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन, वन विभाग, पोलिस अधिकारी उपस्थित असून बिबट्‍याचा शोध सुरू केला असून ठाण्याच्या कोरम मॉलच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. कोरम मॉलचे सी. सी. टीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये बिबट्या मॉलच्या संरक्षक भिंती वरून पहाटेच्या सुमारास बाहेर गेल्याचे निदर्शनास आले.

बिबट्यांच्या शोध घेण्यासाठी वन विभागाकडून संपूर्ण मॉलची व परिसराची पाहणीचे काम सुरु आहे. यामुळे नक्की बिबट्या कुठे गेला याचा शोध वनविभाग आणि पोलीस घेत असल्याची माहिती मिळाली आहे. नॅशनल पार्कपासून कोरम मॉल मधील अंतर तसे खूपच लांब असल्यामुळे या ठिकाणी हा बिबट्या कुठून आला याचा तपास वन विभागाकडून केला जात आहे. तसेच बिबट्याचा कसून शोध घेतला जात आहे. कोरम मॉलच्या मागील बाजूस सिंघानिया आणि सत्कार हॉटेल परिसरात बिबट्याचा शोध सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोखले पूल दुर्घटनेनंतर रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लुट

News Desk

कुर्ला-टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडे

News Desk

चालक नसतानाही बस धावली

News Desk