HW News Marathi
मुंबई

सुशांतच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे सोपवावी, रियाची अमित शाहांकडे मागणी

मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूड हादरले. त्याने आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेतच. तसेच, काही कलाकारांची चौकशी देखील पोलिसांकडून करण्यात आली. मात्र, आता त्याच्या आत्महत्येला एक महिना पूर्ण होत आला असला तरी नेमकी कारण काय हे अद्याप समोर येऊ न शकल्याने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदत मागितली आहे.

इंस्टाग्रामवर सुशांतचा फोटो पोस्ट करत तीने, ‘ अमित शाह सर, मी सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया. सुशांतच्या मृत्यूला एक महिना झाला आहे. मला सरकारवर पूर्ण विश्वास आहे. तरीही न्यायासाठी मी तुम्हाला हात जोडून विनंती करत आहे. या प्रकरणाची सीबीआयकडे चौकशी केली जावी. मला जाणून घ्यायचे आहे की सुशांत याने कोणत्या दडपणाखाली हे पाऊल उचलले’, अशी विनंती रिया हिने अमित शाह यांच्याकडे केली आहे.

https://www.instagram.com/p/CCsrKbQH2th/?igshid=1x8u9vlyq9yif

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अँटॉप हिल स्फोट प्रकरणात दोन जणांना अटक

News Desk

‘आरे’साठी सर्वंकष विकास आराखडा लवकरच तयार करण्यात येईल! – राधाकृष्ण विखे पाटील

Aprna

मराठा पक्ष स्थापनेचा घोषणा?

News Desk