HW News Marathi
महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक

मुंबई। वंचित बहुजन आघाडीकडून आज (२४ जानेवारी) सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये सुमारे ३५ संघटना सहभागी होतील, असा दावा ‘वंचित’कडून करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आला आहे.

या बंदला महाराष्ट्रात किती प्रतिसाद मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सीएए कायदा लागू करण्यामागे आणि देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था यासाठी आम्ही ‘महाराष्ट्र बंद’ची पुकारल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.“महाराष्ट्र बंद करुन झोपलेल्या सरकारला जागे करु, हा बंद शांततेने करणार आहोत, असे प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या आठवड्यात पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.

बंदचा परिणाम

असल्फा घाटकोपर येथे पहाटे बेस्टची बस थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. घाटकोपरच्या कार्यकर्त्यांनी बस अडवली होती मात्र आता वाहतूक सुरळीत सुरू आहे. ठाण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर झोपून आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सत्ता गेल्यावर काही लोक भ्रमिष्ट होतात तर काहींचा तोल जातो, त्यामुळे…

News Desk

महाराष्ट्रात आता भाजप एकट्याने लढेल, पुन्हा फसवणूक नकोय! – चंद्रकांत पाटील

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळेच कारवाईअधिकाऱ्यांचे सीडीआर काढा, सगळे कारस्थान बाहेर येईल! – प्रविण दरेकर

Aprna