नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (३० मे) ५७ मंत्र्यांनी शपत घेतली होती. यानंतर मोदींच्या दुसऱ्या पर्वाचा आरंभ झाला असून यात नव्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप आज (३१ मे) जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील सात शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या वाटेला ४ कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रिपदे मिळाली आहे.
Cabinet portfolios: Rajnath Singh to be the Minister of Defence, Amit Shah to be the Minister of Home Affairs, Nitin Gadkari has been given the Ministry of Raod Transport & Highways and Ministry of Micro, Small & Medium Enterprises. (file pics) pic.twitter.com/YqpNWVBbv8
— ANI (@ANI) May 31, 2019
मोदी सरकारने भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना गृहमंत्री पद देण्यात आले आहे. तर राजनाथ सिंह यांना संरक्षण मंत्री आणि निर्मला सीतारमन यांना अर्थ मंत्री पद देण्यात आले आहे. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील मंत्रिमंडळामध्ये २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कार्यभार राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
Prakash Javadekar has been appointed as Minister of Environment, Forest and Climate Change; and Minister of Information and Broadcasting. Piyush Goyal as Minister of Railways; and Minister of Commerce and Industry. (File pics) pic.twitter.com/4GnRwO1gpY
— ANI (@ANI) May 31, 2019
महाराष्ट्रातील सात मंत्र्यांकडे या खात्याची जबाबदारी
- नितीन गडकरी – भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग
- प्रकाश जावडेकर – पर्यावरण आणि वने, माहिती आणि प्रसारण
- पियुष गोयल – रेल्वे, वाणिज्य उद्योग
- अरविंद सावंत – अवजड उद्योग
- रावसाहेब दानवे – ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा
- संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
- रामदास आठवले – सामाजिक न्याय
General (Retd) VK Singh to be the MoS in the Ministry of Road Transport & Highways, Ramdas Athwale to be the MoS in the Ministry of Social Justice & Empowerment, Anurag Thakur to be the MoS in the Ministry of Finance and Ministry of Corporate Affairs. pic.twitter.com/dyxxIu19Rc
— ANI (@ANI) May 31, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.