HW News Marathi
Uncategorized

HW Exclusive: आम्ही झेंड्यावर राजमुद्रा घेणार, मनसे भाजपसोबत जाणार नाही !

पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या (२३ जानेवारी) राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील हजारो मनसे कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहे. या राज्यव्यापी अधिवेशन पूर्वी मनसेने त्यांचा नवा झेंड्यावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मनसेने छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेल्या नवा झेंडा, नवा अजेंडा आणि पक्षाचे हिंदूत्ववादी रुप उद्याच्या राज्यव्यापी अधिवेशनात कळणार आहे. याकडे राज्याचे सर्व लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या मनसे महिला शहरध्यक्षा रुपाली ठोंबरे यांच्याशी एच. डब्ल्यू. मराठीसोबत खास बातचीत केली आहे. यात रुपाली ठोंबरेंनी, मनसेच्या नव्या झेंड्यावरील राजमुद्रा, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मोदींची तुलना, मनसे-भाजप युती यासारख्या अनेक राजकीय विषयवर त्यांनी मुलाखत दिली आहे.

मनसेच्या नवा झेंडा हा केशरी रंगाचा असून त्यावर छत्रपती शिमवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. यावरून विरोध मनसेवर टीका करत आहे. यावर प्रश्न विचारल्यावर रुपाली ठोंबरे म्हटल्या की, “आम्ही राजमुद्रा घेतली तर अडचण काय?, असा उलट सवालही त्यांनी विरोधकांना एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केला आहे. रुपली ठोंबरे पुढे म्हणाल्या की, “दुसऱ्यांनी राजमुद्राचा वापर करावा तो गादीचा विषय आहे. त्यांच्यावर काही कायदे आहेत. जो जो शिवाजी महाराजांचा मावळा आहे. त्याला राजमुद्रा वापरण्याचा अधिकार आहे,” असे त्या एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हणाल्या. “तुम्ही न्यायालयात जावून आमच्यावर बंदी आण्याचा प्रयत्न करणार, तर आम्ही कायदेशीर लढई लढविण्यास तयार असल्याचे त्या यावेळी सांगितले. जर ते आम्हाला धमकी देणार असेल तर आम्ही आधीही सांगितले होते की, आम्ही जशास तसे उत्तर देऊ,” असा धमकी वजा इशारा देखील त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखतीतून टीकारांना दिला आहे.

महाराजांच्या नावाने भिक नव्हे, जोगवा मागतो

“काही लोकांना वाटते आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भिक मागत आहोत. आम्ही भिक नाही मागत आम्ही मतांचा जोगवा मागतो. याला भिक म्हणे चुकीचे आहे. कारण ज्यावेळी जे लोक आम्हाला बोलतात. जेव्हा ते लोक मते मागण्यासाठी जातात, तेव्हा ते म्हणातात का?, आम्हाला भिक द्या मतांची तुम्ही सन्मानाने मते माघायला जाता. इतर पक्षातील लोकांना अडचण आहे. तर त्याला आम्ही काही करू शकत नाही,” असे म्हणत रुपाली ठोंबरे यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे. आमचा झेंडा बदलणार, राजमुद्रा आम्ही घेणार कोणाला काय करायचे ते करा. छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या एक समुहाचे, एका गटाचे नाही, अशा स्पष्ट शब्दात रुपली ठोंबरेंनी राजमुद्रावर केल्या जाणाऱ्या राजकारणावरून विरोधकांवर टीका केली आहे. आमचा झेंडा बद्दला तर आम्ही तो डोक्यावर घेऊनच नाचणार, तो आमचा स्वभिमान आणि अभिमान असणार आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.

मनसे भाजपसोबत जाणार नाही

“भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण केले. निवडणुकीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वाद लेके चले सबका सात सबका विकास हे करून ते सत्ते आले. मात्र, महाराजांच्या तत्वशी निगडीत काम केले नाही. म्हणून जनतेने त्यांना पायदळी तुडवणे. महाराजांची तुलना करून तुम्ही मते घणार असाल तर जनता ऐवढी मुर्ख नाही,” असे म्हणत भाजपवर टीका केली. तुम्ही महाराजांचे मावळे होऊ शकता, पण महाराजांची तुलना करू शकत नाही. तसेच राज ठाकरेंनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या गैर कारभाराला वचक लावण्याचे काम केले आहे. मनसे हे भाजपसोबत जाणार नाही. तर पणही अधिकार हा राज ठाकरेंचा असून योग्य वेळी ते त्यांचा निर्णय सांगतिले,” असेही त्या एच. डब्ल्यू मराठीशी बोलताना म्हणाले.

राज ठाकरेंनी सर्वात प्रथम भाजपविरोधी सर्वांनी एकत्र यावे, अशी हाक दिल्याचे त्यांनी म्हटले. मनसे भाजपसोबत जाणार नाही, भाजपला जर मनसेसोबत जाण्याची हाऊस असेल. कदाचित भाजपला सक्षम विरोध पक्ष करायाचा असेल. कारण महाविकासआघाडीतील तिन्ही पक्ष त्यांना खाऊन टाकतील, अशी भिती त्यांना वाटत असेल की, कुठे तरी आमचा आधार घेण्याची आवश्यकाता वाटत असेल. तर आमच्या कडूनही कोणतीही पुष्टी तुर्तास तरी नाही पुढे नसेल. मात्र, हा अधिकार राज ठाकरेंचा असल्याचे रुपाली ठोंबरे यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शालेय जीवनामध्येच विद्यार्थ्यांच्या कला – गुणांना वाव दया- पत्रकार शरद पाटील.            

News Desk

ST आंदोलनाचा ग्राउंड रिपोर्ट! थेट BEED मधून

News Desk

जेट एअरवेजच्या उपाध्यक्षांना अटक

News Desk