मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार आज (२१ जानेवारी) सायंकाळी ३.३० वाजता, दादर येथील इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागा आणि आराखड्याची पाहणी करणार आहेत. महाराष्ट्र विकासआघाडी सरकारने सत्तेत येताच अनेक महत्वाच्या कामांना गती देण्याचे काम सुरू केले असून त्यामध्ये इंदू मिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नुकताच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखडयाची पाहणी केली होती.
अजित पवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन येत्या दोन वर्षांत इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याचे जाहीर केले होते. त्याचवेळी अजितदादा पवार यांनी या जागेची पाहणी शरद पवारसाहेब करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार इंदू मिलच्या जागेची व आराखड्याच्या कामाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार करणार आहेत. त्यांच्यासमवेत अल्पसंख्याक मंत्री व मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.