HW News Marathi
महाराष्ट्र

श्री सिद्धीविनायक मंदिराला भक्ताकडून ३५ किलो सोने दान

मुंबई | मुंबईकरांचे आराध्य दैवस म्हणून ओळखले जाणाऱ्या श्री सिद्धीविनायक मंदिर लवकरच देशातील श्रीमंत मंदिराच्या यादीत समावेश होणार आहे. गोरगरीबांसोबत उद्योगपती सिद्धीविनायकाच्या चरणी लीन होतात. या मंदिरात एका भाविकाने ३५ किलो सोने दान दिले. या सोन्याची किंमत जवळपास १४ कोटी रुपये आहे. सिध्दी विनायकाच्या चरणी भक्त दरवर्षी कोट्यवधी रूपयांचे दान करतात. काहीजण रोकड स्वरूपात तर काही जण सोने, चांदीच्या रूपात देवाला भेट देत असतात

गेल्या काही दिवसांपासून सिद्धीविनायकाचे मंदिर शिंदूर लेपनासाठी बंद होते. त्यावेळी भक्ताने दिलेल्या या सोन्याच्या दानातून मंदिराचा गाभारा, घुमट, दरवाजा यासह इतर गोष्टींना सोन्याचा मुलामा देण्यात आला आहेत. १४ ते १९ जानेवारी दरम्यान मुर्तीला शेंदूर लावण्यासाठी सिद्धीविनायक मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. यादरम्यान मंदिराचे दार आणि छतासाठी सोने वापरण्यात येणार असल्याचे सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकरांनी यांनी सांगितले. मात्र, त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास नकार दिला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

OBC Reservation: आता ‘या’ तारखेला होणार सुनावणी

News Desk

“कोणत्याही ST कामगाराला कामावर येण्यापासून अडवू नका!” – अनिल परब

News Desk

“तुम्ही मंत्री असला तरी निर्णय मोदींनाच विचारुन घ्यावे लागतील”, एकनाथ शिंदेचा राणेंवर पलटवार!

News Desk