HW News Marathi
महाराष्ट्र

मेट्रो आता थेट कल्याण – भिवंडी पर्यंत धावणार

मुंबई – मेट्रोचे जाळ आणखीन विस्तारणार असून त्याला राज्यमंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता मेट्रो थेट कल्याण भिवंडी पर्यंत धावणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना नक्कीच दिलास मिळणार आहे. आज झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मेट्रो ५ आणि मेट्रो ६ प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली. मेट्रो ५ अंतर्गत ठाणे भिवंडी कल्याण अशी मेट्रो रेल्वे धावणार आहे. तर मेट्रो ६ लोखंडवाला ते कांजूर मार्ग अशी मार्गिका असणार आहे.

मेट्रोच्या या विस्तारामुळे लोकल सेवे वरील ताण निश्चितच कमी होण्यास मदत होणार आहे. मेट्रो पहिले मुंबई पुरताच मर्यादीत होती मात्र ती विस्तारून आता ठाणे कल्याण आणि अगदी भिवंडी पर्यंत जाण्यास या निर्णयामुळे मदत होणार आहे. भिवंडी कल्याण आणि ठाण्याहून मोठ्या प्रमाणात नोकरदार उपनगरीय लोकलने प्रवास करतात. त्यांना आता मेट्रो हा पर्याय मिळणा आहे. सध्या कुलाबा ते वांद्रे दरम्यानच्या मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरेंना कुणी मुख्यमंत्री मानत नाही, फडणवीसांची ठाकरेंवर जळजळीत टीका!

News Desk

महडमध्ये प्रसादातून विषबाधा तीन बालकांचा मृत्यू

News Desk

दादा, दचकू नका! महाराष्ट्रातील राजकारणात ‘पहाट’ योग एकदाच आला

News Desk