नवी दिल्ली | संपूर्ण देशाला हदरवून टाकणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना १ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता फाशी दिली जाणार आहे. या प्रकरणातील चारही आरोपीं विरोधात पटियाला हाऊस न्यायालयाकडून ‘डेथ वॉरंट’ जारी केले आहे. दोषींना जसे हवे आहे, तसेच होते आहे. दोषींना लवकरात लवकर फाशी द्यावी, तारीख पे तारीख नको. आपली न्यायव्यवस्था अशी आहे की दोषींनी म्हणणे जास्त ऐकले जात आहे, अशी नाराजी निर्भयाच्या आईने व्यक्त केली आहे. निर्भयाची पुढे म्हणली की, “जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत समाधानी नाही.”
Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: Jo mujrim chahte the vahi ho raha hai…tareek pe tareek, tareek pe tareek. Humara system aisa hai ki jahan convict ki suni jaati hai. pic.twitter.com/y3ZdvN52mV
— ANI (@ANI) January 17, 2020
निर्भयाच्या चारही आरोपींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फाशी शिक्षा न्यायालयाकडून सुनावल्यानंतर एक दोषी मुकेश सिंह याने तिहार तुरुंगातून राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने आरोपीचा दयेची याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल (१७ जानेवारी) फेटाळून लावली. त्यानुसार अक्षय ठाकूर (३१), पवन गुप्ता (२५), मुकेश सिंह (३२) आणि विनय शर्मा (२६) नवे डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यानुसार तिहार तुरुंगात चारही दोषींना १ फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता एकाच वेळी फाशी दिली जाईल.
१६ डिसेंबरची ती काळरात्र
१६ डिसेंबर २०१२च्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरू झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयाोसबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने त्यांना विरोध केला. मात्र, आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. त्यावेळी त्यांनी तिला अत्यंत निर्घृणपणे मारहाणही केली होती. त्यामुळे निर्भया गंभीररित्या जखमी झाली होती. यानंतर आरोपींनी निर्भयाला रस्त्याकडेला फेकून दिले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. जखमी निर्भयावर आधी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिला सिंगापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सिंगापूरमध्ये उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.