HW News Marathi
मुंबई

19 ते 22 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता

शेतकऱ्यांनी शेतमाल तसेच जीविताच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे

कृषी विभागामार्फत आवाहन

मुंबई बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 19 ते 22 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या काळात शेतकऱ्यांनी शेतमालाच्या तसेच जीविताच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

19 तारखेला पूर्व विदर्भात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून 20 व 21 ऑक्टोबर रोजी विदर्भातील इतर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होऊ शकते. तसेच मराठवड्यामध्ये सुद्धा 21 व 22 ऑक्टोबर रोजी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दक्षिण विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा या भागात 22 ऑक्टोबर रोजी मर्यादित स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

याच दिवशी मध्य महाराष्ट्र, मुंबई आणि कोकण भागात देखील वादळी वारे आणि मेघगर्जनेसह अतिवृष्टीची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या शेतमालाचे अतिवृष्टीपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी योग्य ती पूर्वतयारी करावी. कापणी केलेला तसेच विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आणलेला शेतमाल व्यवस्थित झाकून ठेवावा.

या काळात विजेचा कडकडाट होऊन वीज कोसळण्याच्या दुर्घटना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकरी बांधवांनी स्वतःच्या आणि जनावरांच्या जीविताच्या रक्षणासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळे मैदान, वीजवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मरच्या जवळ थांबू नये, असेही कृषी विभागाने कळवीले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकारच्या नियोजनशुन्यतेमुळेच तुर उत्पादक शेतकर्‍यांचे हाल – मुंडे

News Desk

अभिनेता सुशांतसिंह सोबत काम केलेल्या एका अभिनेत्याने केली आत्महत्या

News Desk

शांतता क्षेत्रात ध्वनीक्षेपक लावण्यास बंदी

News Desk