HW News Marathi
देश / विदेश

छत्रपतींच्या वंशजांनी भूमिका घ्यावी, असे बोललो तर त्यात चुकीचे काय?

मुंबई | भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून भाजपवर टीका होता आहे. या पुस्तकारचे प्रकाशन काल (१२ जानेवारी) करण्यात आले. यानंतर राज्याचे राजकारण तापले आहे. या पुस्तकारवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. “सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयन राजे, श्रीमंत शिवेंद्रराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे या सर्वांचा आदर आहे. त्या गाद्यांचा आम्ही सन्मान करतो. त्या सर्वांना आम्ही जर यावर भूमिका घ्या, असे बोललो तर त्यात चुकीचे काय?,” असा सवाल राऊतांनी आज (१३ जानेवारी) पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

राऊत पुढे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणे राज्यातल्या भाजपा नेत्यांना मान्य आहे का ? असा सवाल करत महाराजांच्या वंशजांनी तात्काळ राजीनामे द्यायला हवे होते,” असे राऊतांनी म्हटले आहे. “छत्रपती शिवाजी महाराजा आमचे दैवत आहे. त्यांची कोणाशीही तुला होऊ शकत नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत त्यांचा आदर आहे. पण नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना चुकीची असल्याचे राऊत म्हणाले. तसेच, ही तुलना म्हणजे हा राज्याचा अपमान आहे,” असे ही यावेळी राऊत म्हणाले. “भाजपने हे पुस्तक मागे घ्यावे, या पुस्तकाची विक्री थांबवावी, आपला या पुस्तकाशी काही संबंध नाही, असे जाहीर करावे,” असे राऊत म्हणालेत.

दरम्यान, “मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी या विषयावर माझी सविस्तर चर्चा झाली आहे. त्यांनी मला सांगितले की आपली भूमिका योग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजसंदर्भात जर राज्यातील जनता भूमिका घेत असेल तर छत्रपतींच्या वंशजांनीसुद्धा यावर भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. कारण छत्रपतींची तुलना होणे हा राज्याचा अपमान आहे,” असेही राऊत म्हणाले. मोदींना कधी विष्णूचा अवतार म्हणतात. कधी शिवरायांशी तुलना करतात. त्यामुळे भाजपने याबाबत आपली भूमिका जाहीर करावी, असे देखील राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. भाजप नेते संध्याकाळपर्यंत भूमिका स्पष्ट करतील अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सामान्यांचा कडेलोट करायचा की दिलासा द्यायचा, केंद्राला ठरवावंच लागेल – सामना

News Desk

बिहार विधानसभा निवडणूकीत शिवसेनेची कामगिरी असमाधानकारक

News Desk

रियायन्स जिओमध्ये आणखी एका अमेरिकी कंपनीची गुंतवणूक

News Desk