HW News Marathi
महाराष्ट्र

प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेसाठी काँग्रेसकडून प्रस्ताव नाही, वंचित बहुजन आघाडीने पत्रकातून दिले स्पष्टीकरण

मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी वर्णी लागणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. आता या सर्व चर्चा वंचित बहुजन आघाडीने फेटाळून लावल्या आहे. राज्यभेसाठा महाराष्ट्रात ६ खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यात काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याचा चर्चा रंगल्या होत्या. परंतु, वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी प्रसिद्ध पत्रकार काढून आबंडेकरांच्या राज्यसभेच्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही, असे म्हटले आहे. 

वंचित बहुजन आघाडीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमदेवारी मिळणार आहे, अशा बातम्या माध्यमांमध्ये गेल्या काही दिवसांत प्रसारित होत आहेत. या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. तर अद्यापही काँग्रेसकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. राज्यसभेच्या निवडणुका जवळ आला की, काँग्रेसमध्ली एक गट प्रसार माध्यमातील काही लोकांना हाताला घेऊन खोट्या बातम्या पेरण्याचे काम करत असतात. यासारख्या खोट्या बातम्या पेरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि वंचित बहुजन आघाडीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे.”

राज्यसभेच्या जागेसाठी सध्या राज्यात लॉबिंग सुरू आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी काल (१९ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. संभाजीराजे हे अपक्ष म्हणून राज्यसभेत जाण्यासाठी ते राज्यातील नेत्यांच्या भेटी घाटी घेत असून नुकतेच त्यांनी राज्यातील विधानसभेच्या सर्व आमदारांना खुले पत्र लिहून पाठिंब्यासाठी आवाहन केले आहे. काँग्रेसकडून राज्यसभेसाठी आंबेडकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकासआघाडीचे आंबेडकर हे उमेदवारी असण्याची चाचपणी सुरू म्हटले जात असून काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच. के. पाटील हे मुंबईत भेटीसाठी येणार आहे. भेटीदरम्यान, निवडणुकीवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या पुस्तकाच्या एका पानातून भाजप राजकारण करतयं,रोहित पवारांचा फडणवीसांवर आरोप !

News Desk

भाजपने यावर ‘तांडव’ सोडा, पण भांगडाही केला नाही शिवसेनेकडून भाजपचा समाचार

News Desk

राणेंचा मंत्रिमंडळातील क्रमांक कितवा ?

News Desk