HW News Marathi
महाराष्ट्र

अखेर ‘हे’ खाते मिळाल्यानंतर विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर

मुंबई | गेल्या पाच दिवसांपासून नाराज असलेल्या कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची नाराजी अखेर दूर झाली आहे. वडेट्टीवारांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर त्यांची नाराजी दूर झाली आहे. आज (१० जानेवारी) वडेट्टीवार मदत व पुनर्वसन पदभार स्वीकारला आहेत. महासूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने वडेट्टीवार यांची नाराजी दूर झाली आहे.

मी पक्षावर नाराज नाही, वैयक्तिक कारणामुळे अधिवेशनाला अनुपस्थित उपस्थित नव्हतो, असे वडेट्टीवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले. वडेट्टीवार म्हणाले की, “आमचे खाते शिवसेनेकडे दाखविल्यामुळे नाराजी होती. मुख्यमंत्र्यांच्या लक्षात ही चूक आल्यानंतर त्यांनी फोन केला होता, असे ते म्हणाले.

ठाकरे सरकारच्या महाविकासआघाडीचे खातेवाटप नुकतेच पार पडले असून यानंतर वडेट्टीवारांना इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन हे खाते मिळाले होते. मात्र, वडेट्टीवार त्यांना मिळालेल्या खात्यावर नाराज होते.

दरम्यान, वडेट्टीवारांनी खातेवाटपा झाल्यानंतर महाविकसाआघाडीच्या बैठकीला अनुपस्थित होते. तसेच अनुसूचित जाती-अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या मुदतवाढीसाठी एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते. त्यावेळी देखील वडेट्टीवार सभागृहात अनुपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तृप्ती देसाईंना हवे शनिशिंगणापूर देवस्थानचे अध्यक्षपद !

News Desk

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरुन थेट प्रक्षेपण अनुयायांसाठी केले जाणार – धनंजय मुंडे

News Desk

इकबाल मिर्ची मालमता प्रकरण : प्रफुल्ल पटेल चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल

News Desk