HW News Marathi
महाराष्ट्र

उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत तानाजी सावंतांची भाजपला साथ

उस्मानाबाद | शिवसेनेमध्ये नाराजनाट्य संपण्याचे नाव घेत नाही. यात आता शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरी केली आहे. यात तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना महाविकासआघाडीकडून उपाध्यक्षपादासाठी पाठिंबा मिळाला नाही. यामुळे सावंत यांनी भाजपच्या पाठिंब्याने त्यांच्या पुतण्याला उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष पद विराजमान झाला आहे.

उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अस्मिता कांबळे आणि उपाध्यक्षपदासाठी धनंजय सावंत हे भाजपचे उमेदवार आहेत. तानाजी सावंत यांच्यामुळे उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप विजय झाला आहे. तानाजी सावंत यांना मंत्रिपद नाकारण्यात आल्याने त्यांनी जिल्हा परिषदेत शिवसेनेसोबत बंड करत नवा घरोब केला आहे. नाराजी दर्शवली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तानाजी सावंत यांच्यात चर्चाही झाली होती. पण, त्यावेळी सावंत यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांनी मंत्री नकार दिल्याच्या चर्चा काही दिवसापूर्ण रंगला होता.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अशे आहे संख्याबळ

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत एकूण ५५ जागा असून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी २८ हा बहुमताचा आकडा आहे. राष्ट्रवादी २६, शिवसेना ११, काँग्रेस १३, भारतीय जनता पक्ष ४ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील हे आमदार झाल्याने एक जागा रिक्त झाली असून सेनेचे संख्याबळ १० झाले आहे

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘धोकादायक गावांचं होणार पुनर्वसन,’ पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांची माहीती..!

News Desk

उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडी रद्द करून १२ नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडी सुनावली

News Desk

विधीमंडळात खडसेंनी दिला भाजपला घरचा आहेर

News Desk