मुंबई | “आम्ही मुंबई महानगरपालिका निवडणूक एकटे लढणार आहोत,” अशी घोषणा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी एच. डब्ल्यू. मराठीला दिलेल्या मुलाखतीत केली आहे. आगामी काळात राज्यात मुंबई महानगरपालिका निवडणुका होणार आहे. त्यामुळे पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर एच. डब्ल्यू. मराठीने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची आज (१९ मे) मुलाखत घेतलेली आहे. या मुलाखतीत भाई जगताप यांनी आप मुंबई पालिकेची निवडणूक, वार्ड पुर्नरचना, काँग्रेस पालिका निवडणूक एकटी लढणार आदी मुद्यावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस महाविकासआघाडीसोबत लढणार का?, यासंदर्भात एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारल्यावर भाई जगताप म्हणाले, “आम्ही मुंबई महानगरपालिका निवडणूक एकटे लढणार आहोत. मुंबई काँग्रेस ही पालिका निवडणुकीत युती करणार नाही. समजा उद्या एच. के पाटील मुंबईत येणार आहेत. जर उद्या दिल्लीच्या नेत्यांनी काही ठरवले. तर मात्र, आम्ही त्या पद्धतीने करावे लागेल. पण, आम्ही राहुल गांधी यांच्या जवळ बोललो आहे की, आम्हाला एकटे लढू द्या, आम्ही एकटे लढायला तयार आहात. त्यामुळे माची भूमिका ही मुंबई काँग्रेसला एकटे लढायला परवागी द्या, अशी माझी भूमिका राहील.”
वार्ड पुर्नरचनेत जाणीवपूर्वक गडबड, भाई जगतापांचा आरोप
“नऊ वॉर्ड अधिकचे झाल्यामुळे थोडी रचनाबद्दलली आहे. परंतु, काही वॉर्डमध्ये आम्ही पाहिले, तर विशेषता माझा विरोधीपक्ष नेते रवी राजा यांच्या वॉर्डमध्ये जाणीवपूर्वक तिथे काही तरी गडबड केल्याचे जाणवते. कुलाबामध्ये सुद्धा म्हणजे मुंबा देवीमध्ये आमचे निकम परंपरागत काँग्रेसचा वॉर्ड आहे. त्या वॉर्डमध्ये सुद्धा, अशा काही ठिकाणींच्या वॉर्डमध्ये गडबड केली आहे. यासंदर्भात आम्ही आमच्या नेत्यांकडे बोलत आहोत. परंतु, ही वॉर्ड रचनेची घोषणा झालेली आहे. त्यात काय करता येईल, यासंदर्भात आमच्या बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आहेत. त्यांच्या कानावर मी सर्व गोष्टी टाकल्या आहेत. मग बघू काय होते,” भाजपनंतर काँग्रेस देखील वार्ड पुर्नरचनेवर नाराजी व्यक्त केली, याप्रश्नावर भाई जगताप म्हणाले.
‘आप’ ही भाजपची बी टीम – भाई जगताप
आप सुद्धा मुंबईपालिका निवडणुक लढणार यावर भाई जगताप म्हणाले, “सर्व गोष्टी मोफत देणार येणार नाही. ‘आप’ने सर्व मोफत देऊ या एका गोष्टीवर पंजाब जिंकले. परंतु, खरच पंजाबमध्ये सर्व काय मोफत केलेले आहे का?, तसे पाहिले तर पंजाबमध्ये काहीच मोफत झाले नाही. काही गोष्टी नागरिकांना मोफत दिल्या पाहिजे, यात काही वाद नाही. आणि काही गोष्टी आपण मोफत देऊ शकत नाही,” असे ते म्हणाले. पुढे भाई जगताप म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठ वर्षापूर्वी देखील अशाच घोषणा करतात. ‘आप’ ही नरेंद्र मोदींची बी टीम आहे. त्यामुळे आपने ज्या काही घोषणा केल्यात मुंबईकर हे काम बघतात. फक्त मोफत सांगितले की, सर्व काही मोफत होत नाही ना. आम्ही ५०० स्क्वेअर फूटअसलेल्या घरांना टॅक्स नको, असे मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष झाल्यापासून सांगितले. यासंदर्भात मी मुख्यमंत्री, मुंबईपालिका आयुक्त यांना पत्र लिहिले होते. ते आज झाले. यानंतर ५०० स्क्वेअर फूट घराच्या टॅक्स माफ झालेली आहे. मुंबईच्या नागिरकांना मोफीत पाणी मिळावे, ही मागणी देखील मी केलेली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.