HW News Marathi
मुंबई

लिंग बदलून नौदलात काम करणाऱ्या तरुणाचा पर्दाफाश

मुंबई- भारतीय नौदलात शिपाई पदावर नोकरी करणार्‍या एका तरुणाने लिंग बदलल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. पुरूष असताना लिंग बदलून स्री झाल्यानंतर त्या तरुणाची नोकरी अडचणीत आली आहे. कारण नौदलात शिपाई पदावर केवळ पुरूषच काम करू शकतो. मनिषकुमार गिरी असे त्याचे नाव आहे. लिंग बदलल्यानंतर त्याने आपले नाव मनिषऐवजी सबी ठेवले आहे. लिंग बदलण्यासाठी मनिष ऊर्फ सबीने बाविस दिवसांची सुटी घेतली होती. सर्जरी करुन लिंग बदलून तो पुन्हा नोकरीवर हजर झाला होता. सेलरपदावर पुरुषच नोकरी करू शकतात.

मनिषकुमार याने लिंग बदलून भरतीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याला निलंबित करण्यात आल्याची माहीती नौदलाने प्रेसनोटद्वारे जारी केली आहे. मुंबईतील रहिवासी असलेल्या मनिष सात वर्षांपूर्वी ईस्टर्न नेव्हल कमांडच्या मरीन इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये शिपाई (सेलर) पदावर रुजू झाला होता. सेवेत‍ असताना आपल्यात एक महिला असल्याचा त्याला साक्षात्कार झाला. त्याने2016 मध्ये उन्होंने विशाखापट्टनम येथ एका डॉक्टरचे मार्गदर्शन घेतले आणि उपचार सुरु केले. मनिषने सांगितले की,डॉक्टरने त्याला लिंग बदलण्याचा सल्ला दिला होता. नंतर त्याने 22 दिवसांची सुटी घेतली. सुटीच्या काळात दिल्लीत एका खासगी हॉस्पिटलमध्ये सेक्स री-असाइनमेंट सर्जरी करून घेतली. सर्जरीनंतर तो विशाखापट्टनम येथील नौदलाच्या तळावर सबी बनून परतला. काही दिवसांत त्याने केस वाढवले आणि साडी नेसण्यास सुरुवात केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधश्रद्धा वाढवणाऱ्या जाहिरातीला सरकारचं प्रोत्साहन ?

News Desk

गौरी लंकेश हत्येचा मुंबई पत्रकार संघाकडून निषेध

News Desk

मानखुर्दमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांनी केली पोलिसांना मारहाण

News Desk