नवी दिल्ली(वृत्तसंस्था): करवा चौथ हा महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आपल्या पतीसाठी महिला या दिवशी उपवास धरतात. पण दिल्लीत एक दुर्देवी घटना घडली. एका ३७ वर्षीय महिलेने करवा चौथच्या दिवशी अमेरिकेत असलेल्या पतीने आपला फोन उचलला नाही, यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या महिलेचा पती तीन वर्षांपूर्वी लग्नानंतर १५ दिवसांनी अमेरिकेला गेला होता. तो नंतर भारतात परतलाच नाही.
मृत महिलेने करवा चौथच्या दिवशी म्हणजे रविवारी आपल्या पतीला फोन लावला. पण त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या पत्नीने मंगळवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.