HW News Marathi
देश / विदेश

प्राध्यापकांना मिळणार २२ महिन्यांचा पगार, २२हजार कोटींचा केंद्रावर बोजा

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरातील प्राध्यापकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे. कारण देशभरातल्या प्राध्यापकांना केंद्र सरकारचा सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. देशभरातील तब्बल सात लाख ५८ हजार प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. हा आयोग एक जानेवारी २०१६ पासून लागू होणार आहे. त्यामुळे तब्बल २२ महिन्यांचा फरकही मिळणार आहे. आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. दरम्यान, प्राध्यापकांना सातवा वेतन आयोगाच्या अंमलबजावणीने केंद्राच्या तिजोरीवर २२ हजार कोटींचा बोजा पडणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्ली हिंसाचारवर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली

swarit

तुम्ही तुमचा जादुई व्यायामाचा दिनक्रम कायम ठेवा, कदाचित अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल !

swarit

पीएमसी बँकेच्या खातेधारकांनी अर्थमंत्र्यांना घेरले, गव्हर्नरशी चर्चा करणार

News Desk