नवी दिल्ली । जवाहर लाल नेहरू विद्यपीठ (जेएनयू) परिसरात रविवारी रात्री विद्यार्थ्यीं आणि प्राध्याकांमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्या झाला. या हल्ल्यात २० जण जखमी झाले असून जखमी विद्यार्थ्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञांवर गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया भागात रात्री विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला. मुंबईतील विविध विद्यार्थी संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी कँडल मार्च काढत घटनेचा निषेध केला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. गेट वे ऑफ इंडियासह मुंबई आयआयटी आणि पुण्यातील एफटीआयआयमधील विद्यार्थांनी जेएनयूमधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध केला.
Delhi: Students continue to protest outside JNU campus against the violence in Jawaharlal Nehru University earlier today. pic.twitter.com/UOxJdS1LKf
— ANI (@ANI) January 5, 2020
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट करतच म्हटले आहे की, तोंडाला स्कार्फ बांधून काही लोकांनी जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर क्रूर हल्ला केला आहे. या घटनेत काहीजण गंभीर जखमी आहेत. निडर विद्यार्थ्यांना फॅस्टिस्ट शक्ती घाबरल्या आहेत. जेएनयूतील आजचा हिंसाचार याचेच प्रतिबिंब आहे.
The brutal attack on JNU students & teachers by masked thugs, that has left many seriously injured, is shocking.
The fascists in control of our nation, are afraid of the voices of our brave students. Today’s violence in JNU is a reflection of that fear.
#SOSJNU pic.twitter.com/kruTzbxJFJ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 5, 2020
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनेबद्दल ट्वीटमध्य म्हटले की, “जेएनयूमधील हिंसाचाराची माहिती ऐकून मला मोठा धक्का बसला. विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला केला गेला आहे. पोलिसांना तातडीने ही हिंसा थांबावी व शांतता प्रस्थापित करावी. जर विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थी सुरक्षित नसतील, तर देशाचा विकास कसा होईल? , असे सावल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
Spoke to Hon’ble LG and urged him to direct police to restore order. He has assured that he is closely monitoring the situation and taking all necessary steps https://t.co/gpRGCCbwGF
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 5, 2020
जेएनयूच्या हल्ल्यातील घटनेचे सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अभिनेत्री स्वरा भास्कर, आदी नेते मंडळींनी ट्वीटर आदी माध्यमांतून या घटनेचा निषेध नोंदविला आहे.
जेएनयूमध्ये नेमके काय घडले
दिल्लीतील जेएनयूच्या वसतीगृहात रविवारी (६ जानेवारी) अज्ञात इसमांनी मुलीच्या वसतीगृहात हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्या घेऊन हल्ला चढविला. या हल्लायत जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष यांच्यावर हल्ला झाला. या हल्लायत त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. जेएनयूच्या विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अज्ञात हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावले होते. मास्क घालून हातात लोखंडी रॉड, हॉकी स्टीक आणि काठ्या त्यांनी अचानकपणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या प्रकरणाची गृहमंत्री अमित शाह यांनी दखल घेतली असून दिल्ली पोलीस आयुक्तांकडून प्रकरणाची माहिती घेतली. सोबतच या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.