HW News Marathi
महाराष्ट्र

नागपूरच्या अल्पवयीन मुलीवर रायपूरमध्ये बलात्कार

मुंबई घरात वाद घालून रागाच्या भरात घर सेडून गेलेल्या 11 वर्षाच्या मुलीवर रायपूरमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी गावातून रायपूरला निघुन गेली होती. दोन वर्षांनंतर या प्रकरणाची पीडित मुलीने वाच्यता केली. त्यामुळे सदर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी सध्या १३ वर्षांची आहे. रागाच्या भरात घरून निघून आली. नागपूरला पोहोचल्यानंतर येथून ती रेल्वेने रायपूरला गेली.

तेथे दुपारी ४ ते ६ या वेळेत ती रस्ता विसरल्याने इकडे तिकडे भटकू लागली. ते पाहून एका अज्ञात आरोपीने तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिला काही सदगृहस्थ भेटले. त्यांनी तिची कैफियत ऐकल्यानंतर तिला रायपूर पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी तिची सुधारगृहात रवानगी केली. दरम्यान, ती नागपूरची असल्याचे माहीत पडल्याने रायपूर पोलिसांनी नागपूर पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी तिला नागपुरात आणले. दोन वर्षांपासून ती सदरमधील एका सुधारगृहात राहते. तिने लहानशा वयात रागाने घर सोडले म्हणून तिच्या पालकांनीही तिला वा-यावर सोडल्यासारखे केले आहे. तिला येथे तिचे आईवडील भेटायला येत नाही. केवळ आजोबाला तिचा लळा आहे. ते तिला नेहमी भेटायला येतात. मुलीच्या कुटुंबीयांची स्थिती हलाखीची आहे. तिचे वडील सूरत (गुजरात) मध्ये गवंडी काम करतात.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार, उद्धवचा काळ संपला”!

News Desk

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उद्या रायगड दौऱ्यावर जाणार

News Desk

आरोग्‍य यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्तांना सूचना

swarit