HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईत पहाटेपासून रिमझिम, राज्यात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज!

मुंबई। भारतीय हवामान विभागाच्या पावसाच्या अंदाजानुसार मुंबईसह राज्यातल्या तुरळक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात कालही (शुक्रवार) पावसाने बऱ्याच ठिकाणी दर्शन दिलं होतं. आजही विविध ठिकाणी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मुंबईत तर अगदी पहाटेपासून पाऊस सुरु आहे. मुंबईतील चुनाभट्टी, दादर, लालबाग परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली.मुंबईमध्ये रात्री अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडत होता. तर उपनगरांत ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. अगदी आज सकाळी पहाटेपासूनच पावसाने मुंबईकरांना दर्शन दिलं. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पावसाचं पुनरागमन होत आहे. राज्यात 4 ते 6 सप्टेंबर दरम्यान या दोन दिवशी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात येत्या 5 दिवसांत काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात 6 आणि 7 सप्टेंबरला काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता पोलीस आणि अन्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मुंबईत हक्काचे घर

News Desk

खासदार सुप्रिया सुळेंची मयत स्वप्नील लोणकर च्या कुटुंबियांना भेट!

News Desk

‘कस्तुरबा’मधील बेडची क्षमता १०० पर्यंत करणार, ‘कोरोना’च्या तपासणी लॅबची संख्याही वाढवणार

swarit