HW News Marathi
महाराष्ट्र

मला मंत्रिपद नको, सन्मानाने कामाची संधी द्या | प्रकाश सोळंके

मुंबई | “मला मंत्रिपद नको, सन्मानाने कामाची संधी द्या,” अशी बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजलगावचे आमदार मागणी प्रकाश सोळंके यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. सोळंके पुढे म्हणाले की, महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा काल (३० डिसेंबर) विस्तार झाला आहे. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात मला स्थान न मी नाराज होते आणि ते आमदारकीचा राजीनामा देणार होतो.

सोळंके म्हणाले की, ”चार वेळा आमदार राहिल्याने यावेळी मला मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने माझ्या मनात काहीशी नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणारणातून निवृत्त व्हावे या निर्णयापर्यंत मी आलो होतो. मात्र कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले असता त्यांनी कुठलाही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका, असा कल दिला. दरम्यान, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करताना मला पक्षात पूर्वीप्रमाणेच मानाने काम करता यावे अशी अपेक्षा मी व्यक्त केली. पवार साहेबांशीही चर्चा झाली. त्यामुळे आता मी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला आहे,” असे त्यांनी सांगितले.

प्रकाश सोळंकी यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांची मनधरणी करण्यात यश आले. राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्याचे सोळंकींनी माध्यमांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘ सोळंके नाराज असल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून समोर आल्यानंतर त्यांनी आज (३१ डिसेंबर) त्यांना मुंबईला बोलावण्यात आले. आमची चर्चा झालेली आहे. राष्ट्रवादी पक्ष एका कुटुंबाप्रमाणे आहे आणि कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचा मान ठेवणे, त्याला काम करण्याची संधी हे पवार साहेबांचे धोरण आहे. आम्ही त्यांच्याशी बोललो. स्वत: शरद पवारही बोलले. त्यातून प्रकाश दादांचे समाधान झालेले आहे,’ पाटलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी यावेळी भाजपचे रमेश आडसकर यांचा पराभव केला होता. काल (३० डिसेंबर) झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारत त्यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना डावलले गेल्याने सोळंके नाराज झाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राच्या बदनामीविरुद्ध लढलो म्हणून मला तुरुंगात टाकले तरीही मी तयार…

News Desk

अजित पवारांची ‘तंबी’, दोन डोस घेतले तरी नियम पाळावेच लागतील!

News Desk

अशा परिस्थितीत कारवाई केल्याने लोकांच्या मनात शंका – शरद पवार

News Desk