HW News Marathi
राजकारण

…और घमण्ड में हस्तियां अक्सर डूब जाती हैं !

मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-शिवसेनेत झालेला सत्तासंघर्ष आणि त्यामुळे बदलेली राजकीय समीकरणे यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. शिवसेनेची भूमिका कठोरपणे मांडताना संजय राऊत यांनी भाजपच्या केवळ राज्यातीलच नव्हे तर केंद्रातील नेत्यांवरही चांगलेच तोंडसुख घेतले. आता राज्यात महाविकासाआघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरीही संजय राऊत वेळोवेळी विरोधकांचा समाचार घेताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी आज (२६ डिसेंबर) एक शायरी ट्विट करत भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वावर निशाणा साधला आहे.

“तूफान में कश्तियां और घमण्ड में हस्तियां अक्सर डूब जाती हैं”, असे ट्विट करत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हा निशाणा साधला आहे. सध्या एकीकडे देशात सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलेले आहे. अनेक राज्यांतून, राजकीय पक्षांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका होत आहे. तर दुसरीकडे, राज्यातला महाविकासआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने विरोधकांकडून सरकारला धारेवर धरले जात आहे. यावेळी, भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी संजय राऊत यांनी भाजपवर हा निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी यापूर्वी देखील सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून देशात पेटलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे एक ट्विट केले होते. “जहाँ सियासत धार्मिक मसलों को शांत करें वो देश महान होता है. जहाँ सियासत खुद्द धार्मिक मसलों को पैदा करें तो समझो देश गलत लोग चला रहें है”, हे मार्टिन ल्युथर यांचे विचार ट्विट करत संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला होता. त्याचप्रमाणे, “सभी का खून हैं शामिल यहाँ कि मिट्टी मैं, किसी के बाप का हिंदुस्थान थोडी हैं”, असे ट्विट देखील संजय राऊत यांनी केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार निवडणूक लढविणार नाही | शरद पवार

News Desk

राम कदम यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा घरचा आहेर…

News Desk

दावोस जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार

Aprna