मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी सूर्यग्रहण बघण्यासाठी आपण किती उत्सुक होतो, याची माहिती ट्विटर हँडलच्या माध्यमातून दिली. पण दिल्लीमध्ये ढग असल्यामुळे सूर्यग्रहण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता न आल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. काही ठिकाणी ढग असल्यामुळे तेथील नागरिकांना प्रत्यक्ष डोळ्यांनी हे ग्रहण बघता आले नाही. आज झालेले सूर्यग्रहण चालू वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आहे. पंतप्रधान मोदी सुर्यग्रहण पाहत असलेल्या क्षणाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी दिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार? असा सवाल केला आहे. धनंजय मुंडे यांनी सूर्यग्रहण सुटताच मोदी सरकारवर टीका करणारे ट्वीट केले आहे.
आर्थिक डबघाई
बेरोजगारी
महिला सुरक्षा#CAA_NRC साठी सुरु असलेला हिंसाचार
कायदा सुव्यवस्थादिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार? #solareclipse2019 pic.twitter.com/uSFPI766YT
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 26, 2019
पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून म्हटले की, भारतातील अनेक लोकांप्रमाणे मी देखील 2019 मधील अखेरचे सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्सुक होतो. पण मला ढगांमुळे सूर्य दिसला नाही. पण कोझीकोड आणि इतर भागातील ग्रहणाची दृश्ये लाइव्ह स्ट्रिमिंगवर पाहिली. तज्ज्ञांशी चर्चा करून याबद्दल माहिती देखील घेतली.
Like many Indians, I was enthusiastic about #solareclipse2019.
Unfortunately, I could not see the Sun due to cloud cover but I did catch glimpses of the eclipse in Kozhikode and other parts on live stream. Also enriched my knowledge on the subject by interacting with experts. pic.twitter.com/EI1dcIWRIz
— Narendra Modi (@narendramodi) December 26, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.