नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्प्यासाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी उद्या (१९ मे) मतदाना होणार आहे. त्यापूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (१८ मे) गुजरातमधील सोमनाथ मंदिरात शिवलिंगास अभिषेक व त्याची देखील पूजा केली.
Gujarat: BJP President Amit Shah offers prayers at Somnath Temple. pic.twitter.com/vXr5XSAsZN
— ANI (@ANI) May 18, 2019
त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आज (ता.१८) केदारनाथला पोहोचले असून मोदी केदारनाथ मंदिरात दर्शन घेऊन आज तेथेच मुक्काम करणार आहेत. उद्या (ता.१८) मोदी बद्रीनाथला भेट देणार आहेत. विरोधकांकडून अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धार्मिक दौर्यावरुन जोरदार टीका केली जात आहे.
Prime Minister Narendra Modi offers prayers at Kedarnath temple. #Uttarakhand pic.twitter.com/uIm1TGLMEK
— ANI (@ANI) May 18, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी १९ मे रोजी शेवटच्या टप्प्यातील ५९ जागांसाठी मतदान होणार आहे. लोकसभेच्या सातव्या टप्प्यात १९ मे रोजी पंजाबमधील १३, उत्तर प्रदेशमधील १३, पश्चिम बंगालमधील ९, बिहार आणि मध्य प्रदेशमधील प्रत्येकी ८, हिमाचल प्रदेशमधील ४, झारखंडमधील ३ आणि चंदीगडमधील एका जागेसाठी मतदान होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.