HW News Marathi
राजकारण

राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य

नागपूर | राज्यातील बहुचर्चित अशा जवळपास ७२ हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना पूर्णपणे क्लीनचिट मिळाली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवारांच्या समर्थकांकडून त्यांचे नाव लावून धरण्यात आले आहे. आता अजित पवारांना मिळालेल्या या क्लीनचिटनंतर त्यांच्या उपमुख्यमंत्रीपदाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज (२१ डिसेंबर) राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अजित पवारांनी भाष्य केले आहे. “नव्या वर्षापूर्वी राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार होईल. मात्र, याबाबत निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. त्याचप्रमाणे, आमच्या पक्षातून कोणाला कोणते मंत्रिपद द्यायचे ? कोणाला उपमुख्यमंत्रीपद द्यायचे याबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार घेतील”, असे अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

पक्षाकडून राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी तुमच्यावर सोपविण्यात आली तर तुम्ही ती पार पडणार का ? असा प्रश्न अजित पवारांना विचारला. यावर बोलताना , “शरद पवार हेच पक्षातील मंत्रिपदाबाबतचा निर्णय घेतील. उपमुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचे हे शरद पवारच ठरवतील. त्याचप्रमाणे, मी यापूर्वीही सांगितले आहे कि पक्ष आणि पक्षातील वरिष्ठ नेते जी जबाबदारी देतील ती जबाबदारी पार पाडण्याची हिंमत माझ्यात आहे”, असे अजित पवार म्हणाले आहे. महाविकासाआघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी अजित पवार यांनी भाजपला साथ देत, पक्षाशी बंडखोरी करत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर, ३ दिवसांच्या आत त्यांनी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र, अद्याप त्यांनी केलेल्या बंडखोरीसाठी पक्षाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी माढ्याला वळवा !

News Desk

KarnatakaByElection2018 : कर्नाटकात भाजपचा दारूण पराभव

News Desk

मराठा आरक्षणाचा एटीआर विधानसभेत मांडणार

News Desk