HW News Marathi
मुंबई

कोपर रेल्वे स्थानकात टीसीला मारहाण करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

डोंबिवली | टीसीने तिकीट विचारल्याने उद्धट प्रवाशाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना मध्य रेल्वेच्या कोपर रेल्वे स्थानकात घडली. टीसीच्या तक्रारीनंतर रेल्वे पोलिसांनी मारहाण करणाऱ्या रेल्वे प्रवाशाला अटक केले आहे. जानू वळवी असे मारहाण झालेल्या टीसीचे नाव आहे. तर अटक आरोपीचे नाव किशन परमार असे आहे.

वळवी सकाळी कोपर रेल्वे स्थानकात तिकीट तपासण्याचे काम करत होते. दरम्यान किशन परमार या २० वर्षीय तरुणाला त्यांनी तिकीट तपासणीसाठी तिकीट विचारले. यावरून या दोघांमध्ये वादविवाद झाला. यानंतर किशन याने वळवी यांना मारहाण केली. यावेळी स्थानकावर उपस्थित रेल्वे पोलिसांनी किशन परमारला पकडून ताब्यात घेतले.

याप्रकरणी मारहाण करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात किशन परमार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईच्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा मध्यरात्रीपासून संप

News Desk

शिवसेनेकडून नगरसेवकांची पळवापळवी ?

News Desk

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २०२०चा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द

swarit