HW News Marathi
Uncategorized

 मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही !

परळी | हा माझ्या बापा पक्ष आहे, असे म्हणत भाजपच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी पक्ष सोडण्याच्या सर्व चर्चांना पुर्णविराम दिला आहे. पंकजा मुंडे मंचावर आल्यानंतर म्हटल्या की, मन मोकळे केले तरी शरीरात विष तयार होते, असे म्हणत नाव न घेता भाजपवर निशाणा साधला. मी कुणाकडेही काही मागणी करणार नाही, माझी कोणाकडून काही अपेक्षा नाही. काही जण म्हणतात, पंकजा मुंडे दबावाचे राजकारण खेळत आहेत. प्रदेशाध्यक्षपद, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी दबाव आणू पाहत आहेत, पण मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, असेही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलेले आहे.

गोपीनाथ मुंडेच्या रक्ता बोईमानी नाही, गोपीनाथ मुंडेंनी कधी कोणाच्या पाठीत खंजीर घुपसले नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, पण मला कोणतेही पद मिळू नये, म्हणून कुणी प्रयत्न करतेय का? पक्ष कोणाच्या मालकीचा नसतो, मला कोअर कमिटीतून मुक्त करा, असे आवाहनच पंकजा मुंडेंनी भाजप नेतृत्वाला केले आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे बोलत होत्या. जर पदाच्या हव्यासापायी आरोप होत असतील, अशी आक्रमक भूमिका पंकजा मुंडेंनी मांडली आहे. येत्या २६ जानेवारीला गोपीनाथ मुंडेंच्या कार्यालयाचे सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठांच्या मार्फत मी राज्यभर दौरा करणार असल्याचे पंकजा मुंडेंनी सांगितले.

फेसबुक पोस्टनंतर पक्ष सोडण्याच्या अफवा

फेसबुकवर १ डिसेंबरपूर्वी दररोज टीव्हीवर संजय राऊत दिसायचे. परंतु त्यानंतर सर्वत्र फक्त पंकजा मुंडे दिसू लागली, केवळ माझ्याबाबतची चर्चा सुरू आहे, नाथाभाऊ म्हणाले तसे आम्हाला ढकलत ढकलत दारापर्यंत आणले, मी पक्ष सोडणार ही अफवा कोणी सोडली, कोणी सांगितले पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाही, यांची चौकशी भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी करावी, असे विधान पंकजा मुंडेंनीही केले आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहेच शिवाय हतबलही झालेय – नवाब मलिक

News Desk

प्रताप सरनाईक यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

News Desk

स्वारातीमविची एम.फिल. प्रवेशपूर्व परीक्षा ५ मार्चला

News Desk